अर्थखात्यासाठी दिल्लीवारी अट; सुनेत्रा पवारांसमोर भाजपची स्पष्ट भूमिका!

SHARE:

मुंबई – दिवंगत उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अर्थखाते भाजपने आपल्याकडे ठेवले. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखातं आहे. यावरून आता महायूतीमध्ये धूसफूस पाहायला मिळत आहे.भाजपने अजित पवार गटाला अर्थखाते देण्यास नकार दिला आहे. अर्थखाते पाहिजे तर दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करा, अशी अट भाजपने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवली आहे. यावरून आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, अर्थसंकल्प मांडल्यानंतर, चालू अधिवेशन संपल्यानंतर अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाईल स्वाधीन केले जाईल, असे आश्वासन सुरुवातीला भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आता भाजपने अर्थखाते देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर एनसीपी अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली. अर्थखात्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललो आहोत. मात्र, त्यांच्याकडून या विषयावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला की महायुतीमधील भागीदार असलेल्या भाजपने, त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते अद्याप पुनर्वितरित केलेले नाही. त्यांनी सांगितले की अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात यावे, या पक्षाच्या विनंतीला भाजपने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्या म्हणाल्या कि मला असे सांगण्यात आले होते की अर्थ खाते अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मुख्यमंत्र्यांकडेच राहील. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

सत्तावाटपाच्या सूत्रानुसार, अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते आणि या विभागाची धुरा अजित पवार यांच्याकडे होती. मात्र पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे खाते फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले; कारण अजित पवार यांच्या वारसदार असलेल्या सुनेत्रा यांच्याकडे आगामी अर्थसंकल्प सादर करण्याचा अनुभव नव्हता. सुनेत्रा पवार यांच्या मते, भाजपने राष्ट्रवादीच्या या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

अजित पवार असताना अर्थखाते त्यांच्याकडे होते. या न्यायाने हे खाते राष्ट्रवादीला मिळावे अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करून सुद्धा भाजपकडून अर्थ खाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी थेट असे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण आता कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा