जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी जनमोर्चा आक्रमक; १२ जूनला होणार राज्यव्यापी आंदोलन – माजी आमदार प्रकाश शेंडगेंची घोषणा

SHARE:

मुंबई – ओेबीसींच्या मागण्यांसाठी 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, तर ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी असे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. तर 12 जून 2026 रोजी राज्यात ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार, असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे. ओबीसी जनमोर्चाचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे की, राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सरकार घेत असलेल्या काही निर्णयांमुळे ओबीसींच्या हक्कांवर सरकार दूर्लक्ष करत असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल.

राज्यात केवळ राजकीय फायद्यासाठी बहुसंख्य ओबीसी समाजाला गृहीत धरले जात आहे. हक्काचे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्यातील सर्व ओबीसी घटकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. 12 जून 2026 रोजी होणारे हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शांततापूर्ण पण प्रभावी मार्गाने केले जाणार असून, याद्वारे सरकारला ओबीसींची ताकद दाखवून दिली जाईल, असा इशाराही ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष, प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे.

ओबीसी समाजाच्या या राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी जनमोर्चाने सरकारसमोर काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे, परंतु ओबीसींच्या कोट्याला कोणताही धक्का लावू नये, या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, कुणबी प्रमाणपत्रांच्या संशयास्पद वाटपाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष, प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment