गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SHARE:

मुंबई – राज्यात वनखात्याचे नियम मोडून गडचिरोलीतील जंगल मायनिंग प्रकल्पालसाठी उद्योगपतींना देण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध कायम राहणार आहे. वन्यजीव संरक्षण नियम मोडून गडचिरोली जिल्ह्यातील जंगल उद्योगपतींच्या घशात घातले जात आहे. गडचिरोलीमध्ये भाजपा सरकारच्या राजकीय लोकांकडून आपल्या आवडत्या उद्योगपतींना कामे दिली जात आहेत.

मागच्या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात लोहा डोंगरी नावाची मायनिंग सुरु करणार होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. गडचिरोलीमध्ये नवीन होणारे प्रकल्प मीडियामध्ये दाखवले जात नाही. गडचिरोलीमधील हेद्री आणि जवळपासच्या गावात मायनिंगचा प्रकल्पाची कामे उद्योगपतींना दिली असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ही जागा प्रोटेक्टड टायगर कॉरिडॉर मध्ये दिली जात आहे, टायगर कॉरीडॉर हे रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे.

त्यामुळे हा गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्प रद्द करुन टायगर कॉरिडॉर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. 28 एप्रिल 2026 मध्ये पीसीससीएफचे श्रीनिवास रेड्डी जे अधिकारी आहेत त्यांना विचारले गेले की, ही गडचिरोलीतील जमीन मायनिंग ला देऊ शकतो का? श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कोणाचा दबाव आहे. त्यांनी उत्तर दिले नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियम मोडून जंगल हे उद्योगपतींच्या घश्यात जंगल घालत आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, मी मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिले आहे की, श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करावे. गडचिरोली इथे हा मायनिंग प्रकल्प होऊ नये, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ताडोबा इंद्रावतीच्या भागात हा टायगर कॉरीडॉर येतो. लोक म्हणतात महाराष्ट्र मध्ये टायगर पाहायचे असतील तर ताडोबाला जावा. पण तुम्ही अश्या प्रकारे टायगर कॉरीडॉरवर मायनिंग प्रकल्प बननिण्यासाठी परमिशन देत आहात हे चुकीचे आहे.

गडचिरोलीतील मायनिंगचा हा प्रकल्प ज्या भागात येतो आहे, त्यासाठी नॅशनल टायगर ऑथोरिटीकडे जावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 13 मे 2026 चे पत्र पीसीसीएफने लिहिले आहे. की हा फॉरेस्ट कॉरिडॉर नाही असे सांगितले आहे. म्हणजे एप्रिल मधले पत्र आणि मे मधले पत्र वेगवेगळे दाखवत आहे. 1 महिन्यात त्यांना कळत आहे की, एका रिपोर्ट नुसार की, ही जागा टायगर कॉरिडॉर नाही. पदाचा गैरवापर करून अधिकारी लोक व भाजपा सरकार गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला परवानगी देत आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment