मानुसकीचा विजय: आग लागलेल्या इमारतीतून २० जणांना वाचवण्यासाठी रियाजुद्दीन मंसूरी यांनी घातली शर्थीची बाजी

SHARE:

नवी दिल्ली – भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ज्या मुस्लिमांच्या विरोधात तिरस्कारयुक्त बयान देतात किंवा त्यांच्याशी घृणा करतात किंवा त्यांना देशद्रोही म्हणातात त्याच मुस्लिमांनी दिल्लीच्या मालवीय नगरमधील हॉटेल फ्लोरीश स्टेमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीदरम्यान 20 जणांचे प्राण वाचवले. रियाजुद्दीन नावाच्या मुस्लिम व्यक्तीने आपल्या दोन लाख रूपयांच्या गाद्या रस्त्यावर अंथरून जवळपास 20 लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

मालवीय नगर येथील हॉटेल फ्लोरीश स्टेमध्य आग लागल्यानंतर, सर्वत्र धूर आणि आगीच्या ज्वाला पसरत असताना लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. दरम्यान हॉटेलसमोरील गादी विक्रेते रियाझुद्दीन मन्सूरी आपल्या कर्मचाऱ्यांसह हॉटेलबाहेर जमिनीवर दोन लाख रूपयांच्या अनेक रजया व गाद्या अंथरून एक तात्पुरते संरक्षक कवच तयार केले. यामुळे आत अडकलेल्या अनेक लोकांनी सुरक्षितपणे बाहेर उडी मारली आणि त्यांचे प्राण वाचले.

रियाझुद्दीन यांनी सांगितले की गाद्या आणि रजया पसरवणारे ते पहिले होते. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच आठ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. बचावकार्यादरम्यान ते आणि त्यांचा मुलगा जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले कि जीवापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पैसा परत मिळेल, पण जर कोणी आपला जीव गमावला, तर त्याची भरपाई होऊ शकत नाही. त्यांचा हा मोठेपणा अशा वेळी समोर आला आला आहे, जेव्हा देशभरात कथित गोहत्येच्या नावाखाली मुस्लिमांची हत्या केली जात आहे.

रियाझुद्दीनच्या म्हणण्यानुसार, सकाळी अचानक आवाज ऐकून ते बाहेर गेले आणि त्यांनी हॉटेलच्या वरच्या मजल्यांवरून धुराचे लोट बाहेर पडताना पाहिले. लोक खिडक्यांजवळ येऊन मदतीसाठी ओरडत होते. जेव्हा त्यांनी लोकांना इमारतीवरून उड्या मारताना पाहिले, तेव्हा रियाजुद्दिन यांनी आपल्या दुकानातील 2 लाख रूपयांच्या गाद्या रस्त्यावर पसरवून सुमारे 20 लोकांचे प्राण वाचवले. त्याच्या मते, सुमारे आठ जण थेट गाद्यांवर उडी मारल्यामुळे गंभीर दुखापतीतून बचावले. बचावकार्यादरम्यान त्यांचा मुलगा अरमान आणि ते सुद्धा जखमी झाले.

रियाझुद्दीन यांनी सांगितले कि माझे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आम्ही मृत आणि जखमींना नेण्यासाठी चादरीही पुरवल्या. आम्ही रजयांचे कव्हरही दिले. माणुसकीच्या नावावर आम्ही आमच्याजवळ असलेले सर्व काही दान केले. माणुसकी ही हिंदू- मुस्लिम वादापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण सर्व भारतीय आहोत. गरजू लोकांना मदत करणे हे माझे कर्तव्य होते. देशभरात जेव्हा द्वेषाचे राजकारण केले जात आहे, तेव्हा दिल्लीतील वडील-मुलाच्या जोडीने या राजकारणाला बगल देत माणूसकी जिवंत असल्याचे उदाहरण प्रस्तूत केले. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतूक केले जात आहे.

मालवीय नगरच्या दाट लोकवस्तीच्या हौझ राणी भागातील फ्लोरीश स्टे हॉटेलला लागलेल्या आगीत 11 परदेशी नागरिकांसह 21 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या 35 पैकी 19 जणांवर दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अधिकाऱ्यांच्या मते जवळच्या मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक किंवा कुटुंब या हॉटेलमध्ये थांबतात. दिल्ली पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज याला अटक केली असून दिल्ली सरकारने या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment