शासकीय आयटीआय वसतिगृहात विद्यार्थ्याची हत्या; लोखंडी रॉडच्या हल्ल्याने परिसरात खळबळ

SHARE:

पुणे – आयटीआयच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी रॉडने हल्ला करून एका विद्याथ्याची हत्या झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घोडेगाव जवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे.

खूनाची ही धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात एका विद्यार्थ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये अशाप्रकारे हत्या झाल्याने आंबेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. सौरभ साखरे यांची हत्या आयटीआय वसतिगृहाच्या टेरेसवर झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष साखरे वय 23 असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयटीआय महाविद्यालयातील मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहत होता.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि रात्री उष्णतेचा त्रास होत असल्याने हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपला होता. त्याच्यावर याच ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला आहे. या प्रकरणात ऋषिकेश लक्ष्मण बढेकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी अमय भिका कोकरे वय 23 याने पूर्वी झालेल्या भांडणाचा आणि अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४ जून रात्री ते ५ जूनच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने सौरभ साखरे याच्यावर लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या गट्ठîाने डोक्यात वार करून गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात सौरभ साखरे यांचा मृत्यू झाला आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत आरोपी अमेय कोकरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment