एलआयसीच्या गुंतवणुकीत १५ लाख कोटींचा महाघोटाळा? सामान्य पॉलिसीधारकांच्या पैशांचे काय होणार?

SHARE:

मुंबई – सोने चांदीच्या रिफानिंगच्या उद्योगात असलेली सर्वात मोठी राजेश मेहता यांच्या मालकीची कंपनी राजेश एक्सपोर्टसमध्ये वर्ष 2021-25 दरम्यान 15.15 लाख कोटींचा घोळाटा झाल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे राजेश एक्सपोर्ट या कंपनीत सरकारी विमा कंपनी एलआयसीने 347 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. ते पैसे आता बुडल्यात जमा आहे. त्यामुळे याचा फटका एलआयसीला बसला आहे. त्यामुळे याचा पॉलिसी धारकांवर थेट परिणाम होणार असून देशभरातील ज्या सर्वसामान्य लोकांनी विमा काढून एलआयसीत पैसे गुंतवले त्यांनाही याचा फटका बसणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सोने चांदीच्या रिफानिंगच्या उद्योगात असलेली सर्वात मोठी कंपनी राजेश एक्सपोर्टसमध्ये वर्ष 2021-25 दरम्यान 15.15 लाख कोटींचा घोळाटा झाल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. सेबीने याला इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे म्हटले आहे. सेबीच्या अनुसार, राजेश एक्स्पोर्ट्सने त्यांच्या एकूण उत्पन्नातील तब्बल 98 टक्के हिस्सा फुगवून दाखवला. प्रमोटर्सच्या माध्यमातून निधीचा चुकीचा वापर करणे आणि चुकीची आर्थिक माहिती देणे, असे गंभीर आरोप कंपनीसह मेहतांवर सेबीने लावले आहेत. या आदेशानंतर सेबीने राजेश मेहता आणि त्यांच्या कंपनीच्या शेअरच्या खरेदी- विक्रीवर बंदी घातली आहे.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. राजेश एक्सपोर्ट्समध्ये सरकारी विमा कंपनी एलआयसीची सुमारे 10.80 टक्के हिस्सेदारी असून कंपनीत 347 रुपये कोटींची गुंतवणूक आहे. याचा मोठा फटका एलआयसीला बसला असून ज्यांनी विमा काढून एलआयसीत पैसे गुंतवले त्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विशेष बाब गेल्या 10 वर्षांमध्ये राजेश एक्सपोर्टसमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, म्युच्युअल फडांनी गुंतवणूक केली नाही. मात्र, एलआयसीची गुंतवणूक पाच पट वाढली. म्युच्युअल फंडांनी देखील 0.5 टक्के असलेली आपली गुंतवणूक पूर्णपणे काढून घेतली. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी देखील राजेश एक्सपोर्टमध्ये गुंतवणूक केली नाही. मात्र, सरकारी मालकीची विमा कंपनी एलआयसीनं मात्र गेल्या 10 वर्षात राजेश एक्स्पोर्टसमधील गुंतवणूक पाच पटीने वाढवली. कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत असतानाही एलआयसीने आपली गुंतवणूक कायम ठेवली.

सेबीने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता एलआयसीचे 300 कोटी रुपये बुडल्यात जमा आहेत. देशातल्या अनेक सर्वसामान्य कुटुंबानी ज्या एलआयसीचा विमा काढला त्याच एलआयसीचे कोट्यावधी रुपये आता शेअर बाजारात एका झटक्यात बुडालेत. यामुळे देशभरातील ज्या सर्वसामान्य नागरिकांनी विमा काढून एलआयसीत पैसे गुंतवलेले त्यांनाही याचा फटका बसणार का, असा थेट प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

यावरूनच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की 15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा अकाउंटींग घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना एलआयसीने गुंतवणूक केलीच कशी? असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment