नवी दिल्ली – मालवीयनगर आग प्रकरणात फरार आरोपी जय मिश्राला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून 60 मोबाईल व 30 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली आग प्रकरणात हॉटेलच्या मुख्य अकाउंटंट फरार आरोपी जय मिश्राला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दिल्लीतील मालवीय नगर येथे गेस्ट हाऊसला लागलेल्या आगीत 22 जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर फरार असलेला हॉटेलचा मुख्य अकाउंटंट जय मिश्रा याने सोमवारी साकेत न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जय मिश्रा हा हॉटेलचे व्यवस्थापन, परवाने, ना-हरकत प्रमाणपत्र आणि कायदेशीर कागदपत्रांची कामे मॅनेजर राकेशसोबत मिळून पाहत होता.
या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज आणि कुक केशव नेगी यांना अटक केली आहे. किचनमधील इलेक्ट्रिक शेगडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले, याचाही तपास सुरू आहे.
गेस्ट हाऊसमध्ये सीलबंद खिडक्या, कुलूप लावलेले आपत्कालीन दरवाजे आणि अपुरी वायुविजन व्यवस्था असे अनेक नियमभंग आढळून आले आहेत. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळावरून 60 मोबाईल आणि 30 पासपोर्ट जप्त केले आहेत. मृतांमध्ये मेडिकल व्हिसावर भारतात आलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि परवान्यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात अधिक तपास दिल्ली पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






