पुणे – राज्यात गर्भलिंग निदानासाठी चिनी ॲपचा गैरवापर वाढला आहे. तर बार्शी, करमाळा व आळंदी परिसरात बेकायदेशीर गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात चिनी ॲपचा गैरवापर वाढल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात एक मोठे गर्भपाताचे रॅकेट समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या तपासात हा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात एका दलालाच्या मोबाईलमध्ये गर्भलिंग चाचणीसाठी वापरले जाणारे चिनी अँप सापडले आहे.
राज्यात अनेक भागात चिनी ॲपचा माध्यमातून होणाऱ्या गर्भपात रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
या गर्भपात रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भागांपर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या तपासात अनेक डॉक्टर आणि दलालांचा या रॅकेटमधील सहभाग असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या एका दलालाच्या मोबाईलमध्ये गर्भलिंग चाचणीसाठी वापरले जाणारे चिनी ॲप सापडल्यामुळे गर्भपाताचे मोठे रॅकेट असल्याची तपासात माहिती मिळाली आहे. चिनी ॲपच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने गर्भलिंग चाचणी केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये 2026 च्या मार्च महिन्यात बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर, एका आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात त्याच्या मोबाईलमध्ये गर्भपातासाठी वापरले जाणारे चिनी ॲप सापडले. तसेच काही उपकरणांच्या मदतीने बेकायदा गर्भपात शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील अण्णा गिरी असल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.
या प्रकरणात 2 डॉक्टरांविरोधात पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम राबवली आहे. या तपासणीवेळी एका खासगी रुग्णालयाच्या नोंदींची पडताळणी करताना बार्शी, करमाळा आणि आळंदी परिसरातील काही महिलांनी तेथे गर्भपात केल्याचे तपासात समोर आले आहे. बेकायदा गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा गिरी हा पुण्यातील कोंढवा येथील एका खासगी रुग्णालयात काम करत असल्याचे समोर आले आहे.
गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा गिरी याच्या गैरप्रकारांबाबत माहिती असूनही त्यावर पुणे पोलिसांनी व आरोग्य खात्याने वेळीच कारवाई का केली नाही, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असताना अण्णा गिरीच्या हालचालींकडे पुरेसे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या काही प्रकरणांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित कारवाई पुढे ढकलली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात बेकायदा गर्भपाताची प्रकरणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






