तृणमूलमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; खासदार सुष्मिता देव यांची पक्षाला सोडचिठ्ठी

SHARE:

नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय नाराजीनाट्य सुरूच, आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना मोठा राजकीय धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षातच अंतर्गत बंडखोरी दिवसेंदिवस वाढली आहे. तृणमूल खासदार सुष्मिता देव यांनी राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद अधिक वाढला असल्याचे दिसत आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस पक्षात बंडखोरीच्या व राजकीय नाराजीनाट्य सुरू आहे. सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षात आणखी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, तृणमूल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील दीर्घकाळचे मुख्य नेते सुखेंदू शेखर रॉय यांनीही तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला होता.

तृणमूल काँग्रेस पक्षातील राजीनाम्यांचे हे चाललेले नाराजीनाट्य स्पष्टपणे दर्शवते की तृणमूल काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद झपाट्याने वाढत आहे. पशिचम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तृणमूल काँग्रेस पक्षात अंतर्गत फूट पडू नये यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. पण एक-एक करून तृणमूल काँग्रेस पक्षातील त्यांचे जुने सहकारी त्यांना सोडून जात आहेत. काही दिवसांपूर्वीच, लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी दावा केला होता की, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांचा त्यांना पाठिंबा आहे. पक्षांतर बंदी कायदा टाळण्यासाठी विरोधी गटाला 19 खासदारांची आवश्यकता असते. खासदार सुष्मिता देव एकेकाळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या सहकारी होत्या. मात्र, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्ण यांना लिहिलेल्या पत्रात खासदार सुष्मिता देव यांनी म्हटले आहे की, मी राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. आपण तो तात्काळ स्वीकारावा.

खासदार सुष्मिता देव यांनी 2021 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या काँग्रेस पक्षातील अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रमुख होत्या. आणि त्यांनी आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे. सुष्मिता देव आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटल्याची माहिती आता समोर आली आहे.

खासदार सुष्मिता देव भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी राजकीय चर्चा सूरू आहे. खासदार सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनजी यांच्या पक्षातील एक जवळच्या महिला नेत्या सोडून गेल्यामुळे, तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढल्याचे समोर आले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment