भिवंडी – महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्ताला 2 लाख 50 हजारांची लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अडीच लाखांची लाच घेताना सहाय्यक आयुक्त जाळ्यात अडकला आहे. भिवंडी महापालिकेत खळबळ उडाली आहे. भिवंडी महानगरपालिकेत पुन्हा एकदा एसीबीकडून कडक कारवाई झाली आहे. भिवंडी महानगर पालिकेतील प्रभाग समिती क्रमांक 3 चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबी पथकान पकडले आहे.
प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर हे मूळचे सर्वेअर तथा इमारत निरीक्षक पदावर आहेत. त्यांच्याकडे भिवंडी महानगर पालिकेतील प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार होता. या कडक कारवाईमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्रमांक 3 च्या हद्दीत एका ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू होते. या अनधिकृत बांधकामावर भिवंडी महापालिके मार्फत कारवाई न करण्यासाठी आणि बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी तक्रारदाराकडे स्वतः 5 लाख रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीअंती 2 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी ठाणे एसीबी विभागाकडे जाऊन या प्रकरणी कायदेशीर तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या अर्जावरून ठाणे एसीबी पथकाने आधी प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी लाच मागितल्याची चौकशी केली आहे. लाच मागितल्याचे सिद्ध होताच, ठाण्यातील एसीबीच्या पथकाने भिवंडी महापालिका प्रभाग समिती कार्यालयाबाहेर सापळा रचला होता.
भिवंडी महापालिका कार्यालयाबाहेरील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या स्वतःच्या हुंडाई क्रेटा कारमध्ये बसून प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम घेताना पकडण्यात आले आहे. एसीबी पथकाने प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना लाच घेताना पकडले आहे. या कारवाईनंतर प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे रात्री उशिरापर्यंत प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांची चौकशी करण्यात आली आहे.
त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पहाटे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना कायदेशीररित्या अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेत भ्रष्टाचार वाढलेल्या आहे, हे आता उघडकीस आले आहे. हे या कडक कारवाईने पुन्हा एकदा भ्रष्टाचार प्रकरणे वाढल्याचे दिसत आहे. एका वरिष्ठ अधिकार्याला भिवंडी महापालिका कार्यालयाच्या परिसरात गाडीत लाच घेताना पकडले आहे. भिवंडी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात अधिक तपास एसीबी करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






