ठाणे – आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांकडून 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. काश्मीरमधील 2 तस्करांना अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. संबंधित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत, तर काश्मीरमधील 2 सराईत तस्करांना अटक केली आहे. गुपित माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कळवा येथील खारेगाव परिसरात सापळा रचून ही कडक कारवाई केली आहे. 2 आरोपींकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 2 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12 हजार 974 ट्रामेडोल कॅप्सूल यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंमली पदार्थांची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या तपासात या रॅकेटचे धागेदोरे जम्मू-काश्मीरशी जोडलेले असल्याचे उघडकीस आले आहे. हे संपूर्ण जाळे काश्मीरमधील कुपवाडा भागातून कार्यरत होते.
भारतीय सीमा ओलांडून हे अंमली पदार्थ प्रथम काश्मीरमध्ये आणि त्यानंतर ठाणे व मुंबई परिसरात पुरवले जात होते. या प्रकरणात 2 मुख्य तस्करांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 2 आरोपींना त्यांना 12 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात अधिक तपास ठाणे गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






