तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती; तामीळनाडूच्या सुखी संसाराला ब्राह्मणी वाळवी पोखरून काढेल !

SHARE:

(भाग – ६) – भारतीय राजकारणात जर एखाद्या पक्षाला पुरोगामी वा क्रांतीकारक विचारांची बैठक नसेल व संघटनात्मक काम नसेल तर अशा प्रस्थापित विचारांच्या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. हे करोडो रूपये केवळ मते विकत घेण्यासाठी नव्हे तर माफिया, गुंडांना व षडयंत्रकारी बुद्धीजीवींना पोसण्यासाठीही खर्च होतात. ब्राह्मणवाद्यांनी प्रशांत किशोर नावाचा ‘ईलेक्शन-भगवान’ निर्माण केलेला आहे. या नव्या ईलेक्शन भगवानाला सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची ऑफर असते, त्यावरून त्याची किंमत किती करोडोंची असेल याची तुम्ही कल्पना करू शकतात. 

मी मागच्या तिसर्‍या भागातील एक वाक्य पुन्हा उद्धृत करतो- ‘‘राजकीय महत्वाकांक्षी लोक कधीही खिशातून पैसे खर्च करून राजकारण करीत नाहीत.’’ मग निवडणूका लढण्यासाठी या प्रस्थापित राजकीय पक्षांना करोडो रूपये कोण देत असतो? मला हे रहस्य माझ्या एका कुंभार-ओबीसी पत्रकाराने सांगीतले. अर्थात तो या व्यवहारातील एक मोठा ‘वाहक’ म्हणून काम करतो. देश-विदेशातील कारखानदार-मक्तेदार-भांडवलदार संघटीतपणे काही फायनॅन्सियल संस्थांच्या मार्फत हे करोडो रूपये गोळा करतात व हे पैसे भारतातील प्रस्थापित राजकिय पक्षांना निवडणूकांच्या तोंडावर हवाला रॅकेटमधून वाटप केले जातात. अर्थात ब्राह्मण-क्षत्रिय जातींच्या प्रस्थापित पक्षांना सत्तेत बसवण्यासाठी वोट-कटर चे काम करणार्‍या काही तथाकथित पुरोगामी-फुलेआंबेडकरवादी पक्षांनाही त्यांच्या लायकीप्रमाणे पेसे मिळतात. भारतातील हवाला वाटपाच्या नियंत्रण कक्षात संघाचे भक्त असतातच. संघ-भाजपाने प. बंगालमधील ममता बॅनर्जींची मुस्लीम वोट बँक कट (Divert) करण्यासाठी हुमायू कबीरला करोडो रूपये दिलेत, ते कूठून आलेत याचे उत्तर वरीलप्रमाणे आहे.

तामीळनाडूतील विजयला कोणताही वैचारिक-राजकीय वारसा नाही व इतिहासही नाही. अशा राजकीय नवख्या व्यक्तीवर केवळ पक्ष स्थापन केल्यावर कोणी भांडवलदार का म्हणून आपले करोडो रूपये इन्व्हेस्ट करेल? कोणताही वारसा वा इतिहास नसतांनाही विजय ने पक्ष स्थापना केली, लगेच निवडणुका लढवल्यात आणी ताबडतोब हाती सत्ता आली! याचा अर्थ विजयलाही हुमायु मुसलमानाप्रमाणे करोडो रूपये दिले गेले आहेत, तर त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे.

या आधीचे संघाचे पालतू असलेले रजनिकांत व कमल हासन करोडो रूपये देउनही सपशेल अयशस्वी ठरलेत. त्यातून अनुभव घेउन नवा बळीचा बकरा विजय शोधला. आणि तो पहिल्याच फटक्यात यशस्वीही झाला. या मागील खरे कारण हे आहे की, रजनीकांत व कमल हासन यांच्या पाठीमागे कोणतीही स्व-जातीची व्होटबँक नव्हती व नाही. त्यामुळे सुपरस्टार असूनही ते फेल गेलेत व विजयच्या पाठीशी स्व-जातीची व स्व-धर्माची व्होटबँक आहे, त्यात करोडो रूपये ओतल्यावर तो यशस्वी झाला आहे. विजयपाशी वैचारिक शिदोरी नसल्याने त्याला पैशांची भली-मोठी शिदोरी संघ-भाजपाने भांडवलदारांमार्फत पुरविली एव्हढेच!

विजयला मिळालेल्या यशाचा आनंद सर्वात जास्त कोणाला झाला? भाजपाला झाला का? भाजपाला झालाच असणार कारण करते-करविते संघ-भाजपाच आहेत. पण ते विजयपासून बरेच अंतर ठेवून आहेत. कारण सुरक्षित अंतर ठेवणे हाही षडयंत्राचाच एक भाग आहे. परंतू कॉंग्रेसला विजयच्या विजयाचा इतका आनंद का झाला असेल? कॉंग्रेस पक्ष तामीळनाडूमध्ये नेहमीच डी.एम.के. शी आघाडी करून निवडणूका लढवतो! आपल्या स्वतःच्या आघाडी पक्षांना शत्रू पक्षाच्या विजयने पराभुत केले या बद्दल कॉंग्रेसला आनंद का झाला असेल, असा प्रश्न सूज्ञ माणसाला कधीच पडणार नाही, कारण कॉंग्रेस पक्ष हा मुळातच कधी छुपा तर कधी उघड ब्राह्मनवादी पक्ष आहे, हे उघड गुपित आहे! कॉंग्रेसला विजयच्या (TVK) पक्षाच्या विजयामुळे इतका मोठा आनंद झाला की त्यांनी निकालाच्या दिवशीच उत्स्फुर्तपणे विजयला सरकार बनविण्यासाठी बिनशर्त पाठींबा दिला, आणी तोही विजयने न मागताच! न मागता पाठींबा देणार्‍यांममध्ये पहिले नाव येते शरद पवारांचे आणि आता दुसरे नाव येते राहूल गांधींचे! दोन्ही कॉंग्रेसी! पहिल्या-वाल्याने 2014 साली सरळ भाजपला महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी पाठींबा दिला आणि दुसर्‍या-वाल्याने आता सरळ संघ-भाजपाच्या षडयंत्राला पाठींबा दिला. तामळनाडूमधील पाचही कॉंग्रेस आमदारांना DMK च्या कार्यकर्त्यांनी भर चौकात पळवून-पळवून बेदम मारले. पेरियारवादी विचारांशी गद्दरी केल्यामुळे कॉंग्रेसला ही शिक्षा होणारच होती. परंतू मार खाउनही कॉंग्रेसचे आमदार विजयला पाठींबा देत असतील तर गांभिर्याने विचार केला पाहिजे.

तामीळनाडूमध्ये संघ-भाजपच्या केन्द्र सरकारने नियुक्त केलेला राज्यपाल आहे. विजय जर संघ-भाजपाच्या षडयंत्राचा एक भाग असेल तर संघ-भाजपाच्या राज्यपालाने विजयला लगेच मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायला पाहिजे होती. पण तसे झाले नाही. राज्यपालाने विजयला सरकार स्थापण्यासाठी चार चकरा का मारायला लावल्या? सुरक्षित अंतर ठेवण्याचे षडयंत्र म्हणून का? ते तर आहेच, पण त्याहून मोठे कारण आहे. केवळ कॉंग्रेसने पाठींबा दिल्याने विजय बहुमतांपर्यंत पोहोचतच नव्हता. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या चार आमदारांचा पाठींबा आवश्यक होता. त्यात पुन्हा AIADMK या जयललितांच्या पक्षाने स्टॅलिनच्या DMK पक्षाशी युती करून सत्ता स्थापण्याची घोषणा केली. कम्युनिस्ट पक्ष सहसा गद्दारी करीत नाहीत, असे नरेटिव्ह आहे. त्यामुळे संघ-भाजपाने नियुक्त केलेल्या राज्यपालाला विजयचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल कि नाही, याची शंका होती. विजयचे सरकार भक्कमपणे पाच वर्षे टिकले तरच पेरियारवादाविरोधात षडयंत्रे करता येतील याची जाणीव संघ-भाजापाला होती आणी आहे. म्हणून राज्यपालाने विजयला वारंवार कम्युनिस्ट पक्षांच्या आमदारांकडे पाठविले. कम्युनिस्टांचा पाठींबा मिळाल्यानंतरच राज्यपालाने विजयला शपथविधीची परवानगी दिली.

तामीळनाडुमध्ये कॉंग्रेस, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी व इतर छोट्या पक्षांचे जे 7-8 आमदार निवडून येतात ते केवळ DMK पक्षाशी युती केल्यामुळे! भाजपचा एकमेव आमदार निवडून आला तोही केवळ AIADMK पक्षाशी युती केल्यामुळे! पेरियारवादाच्या क्रांतीकारी वटवृक्षावर उसने जीवन जगणार्‍या या परोपजीवी बांडगुळांनी पेरियारवादाशी गद्दारी करीत संघ-भाजपाच्या पालतू विजयचे सरकार स्थापन करण्यासाठी पाठींबा दिला. यावरुन हे किती मोठे षडयंत्र आहे याची कल्पना येते.

विजयने निवडणूक काळात प्रथम बाबासाहेबांचा फोटो दाखविला व नंतर मस्जिद, गणपती व चर्च या तीघांचा एकत्रित फोटो दाखविला. यावरुन त्याचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे याची कल्पना तेव्हाच आली. तो उघड-उघड जाती-धर्माचे विघातक राजकारण करतो आहे व पुढे त्याचे काय परिणाम होतील याचीही कल्पना येउ शकते. विधानसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विजयने या जात-धर्माच्या विघातक राजकारणाची झलक दाखवून दिली. विजयने विधानसभेत पहिल्याच दिवशी आपल्या ऑफिसच्या अत्यंत महत्वपूर्ण मोक्याच्या व मार्‍याच्या OSD पदावर संघी-ब्राह्मण असलेल्या पांडे-ज्योतीषाची नियुक्ती केली. विजयचे हे ब्राह्मणी षडयंत्र ओळखले DMK चा विरोधीपक्षनेता उदयनिधिने व आंबेडकरवादी डॉ. थिरूवलन यांच्या पक्षाच्या दोन आमदारांनी! पेरियारवादी व आंबेडकरवादी आमदारांच्या तीव्र विरोधापुढे गद्दार विजयने गुडघे टेकले व लगेच त्या संघी-ब्राह्मण ज्योतीषाची OSD  पदावरून हकालपट्टी केली. हा ज्योतिषी विजयच्या मोठ्या सभांचे मुहुर्त काढून देत होता. यानेच शुभ-मुहुर्तासाठी शपथविधीची तारीख पुढे ढकलण्यास राज्यपालांना भाग पाडले.  

विजयने आपल्या जात-धर्माच्या विनाशक राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. डॉ. बाबासाहेबांचा फोटो व मस्जिद, गणपती व चर्च यांचा एकत्रित फोटो दाखवून दलित, मुस्लीम, ब्राह्मण व ख्रिश्चन यांची मते घेतली, परंतू सत्ता आल्यावर ब्राह्मण ज्योतीषाच्या नियुक्तीपासून कारकिर्दीची सुरूवात केली. विजयने किती ब्राह्मण आमदार निवडून आणलेत व त्यापैकी कीती मंत्री केलेत हा मुद्दा महत्वाचा नाही. संघाची ताकद राजकिय पदांमधून येत नाही. प्रशासकीय ताकदीतून संघ आपले इप्सित साध्य करीत असतो. आता OSD पदाच्या नियुक्तीवरून एक गोष्ट निश्चित झाली आहे की, तामीळच्या प्रशासनात आता मोक्याच्या व मार्‍याच्या जागांवर संघी-ब्राह्मणांची लॅटरल एन्ट्री मोठ्या प्रमाणात होणार व प्रशासनाच्या माध्यमातून तामीळनाडूमध्ये जातीय व धार्मिक हाःहाःकार उडणार! 

तामीळनाडू वगळता इतर राज्यातून रोज अनेक बातम्या येतात, त्यात किमान 2-3 बातम्या हमखासपणे हिन्दू-मुस्लीम द्वेषाच्या असतातच! आणी या बातम्या वारंवार रिपीट करून दिवसभर दाखविल्या जातात. गेल्या 60 वर्षांच्या पेरियारयुगात तामीळनाडूत एकही जातीय दंगल वा धार्मिक दंगल झालेली नाही. राजीव गांधी हत्याकांडातील बॉम्बस्फोट सोडला तर गेल्या 60 वर्षात एकही बॉम्बस्फोट तामीळनाडुत झालेला नाही. आता मात्र विजयच्या खांद्यावर बसलेल्या ब्राह्मणी संघी-युगात धार्मिक दंगा-फसादच्या बातम्या, जाती-जातीतील संघर्षाच्या बातम्या व बॉम्बस्फोटाच्या बातम्या तामीळनाडूमधून रोज येणार व टी.व्हीवर त्या बातम्या वारंवार रिपीट करून 4-4 दिवस दाखविणार! 

भल्या मोठ्या जहाजाला छोट्यातले छोटे छिद्रही बुडवून टाकते. अंथरूणात घुसलेला एक लहानसा ढेकूणही पूर्ण रात्र जागवतो. वाळवीचा एक छोटासा किडा अख्खा महाल पोखरुन काढतो. म्हणून स्टॅलिनने ब्राह्मणांना तिकीटे नाकारलीत. ब्राह्मण आमदारही नको आणी ब्राह्मण मंत्री तर अजिबात नको. ‘‘माझ्या प्रेतावर ब्राह्मणाची सावलीसुद्धा पडू देउ नका’’ असे आपल्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगणार्‍या तात्यासाहेब महात्मा फुलेंचा खराखुरा वारसदार म्हणजे सामी पेरियार आणी पेरियारवादी DMK पक्ष! ब्राह्मणविरोधी पेरियारवादी राजकारणाचा दरारा तामीळनाडूतील सर्वच लहान-मोठ्या पक्षांवर प्रभाव गाजवीत असतो. त्यामुळे विजयचा पक्ष वगळता बाकी सर्व आंबेडकरवादी, ब्राह्मणवादी कॉंग्रेस-भाजप व डाव्या-कम्युनिस्ट पक्षांनी ब्राह्मणांना आमदारकीचे तिकीट देण्याचे धाडस दाखविले नाही. शुद्ध ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपानेही एकाही ब्राह्मणाला तिकीट दिले नाही. केवळ राजकारणाला ‘ब्राह्मण-मुक्त’ करून चालत नाही, तर प्रशासन व इतर सर्व धार्मिक-आर्थिक वगैरे महत्वाच्या क्षेत्रातूनही ब्राह्मणांचे वर्चस्व मोडीत काढने आवश्यक असते. तरच ते राज्य खर्‍या अर्थाने ‘ब्राह्मण-मुक्त राष्ट्र’ किंवा ‘शूद्ध अ-ब्राह्मणी राष्ट्र’ म्हणून ओळखले जाउ शकते. डी.एम.के. पक्षाने ते करून दाखविले. तामीळनाडूच्या प्रशासनात ब्राह्मणांच्या लोकसंख्येइतकेच ब्राह्मण अधिकारी असतील याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली गेली. प्रशासनातील ब्राह्मण अधिकार्‍यांची संख्या वाढेल या भीतीपोटी स्टॅलिन सरकारने राज्यात EWS आरक्षण नाकारले. परंतू आता तामीलनाडुच्या शासन-प्रशासनात विजयच्या खांद्यावर बसून झालेला ब्राह्मणांचा चंचूप्रवेश तामीळनाडूच्या सुखी संसाराला पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही.  

कोणत्याही सामाजिक-राजकीय घटनेला किमान दोन बाजू असतात. आतापर्यंत आपण तामीळनाडूतील नुकत्याच घडलेल्या प्रतिक्रांतीची एक बाजू म्हणजे विजयची बाजू बघीतली. शेवटच्या लेखांकात पेरियारवादाच्या मर्यादा व DMK च्या राजकीय चूका याचे विश्लेषण करणार आहोत.

तो पर्यंत जय जोती, जय भीम व जय पेरियार ! 

 

लेखक – प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क –  ८१ ७७ ८६ १२ ५६

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment