छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य विशेष अभंग…

SHARE:

छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती शाहू । राजाच्या रूपात ।
जन्मले ग्रामात । कागलात ।।१।।

शाहुंचे संस्थान । एक कोल्हापूर ।
कार्य सर्वदूर । भारतात ।।२।।

पेटवून दिली । प्रकाशाची वात ।
तिमिराची रात । संपविली ।।३।।

बोले तैसा चाले । कर्ते सुधारक ।
प्रजेचे नायक । कर्मांनीच ।।४।।

छत्रपती शाहू । आरक्षण दाते ।
पहिलेच नेते । भारतात ।।५।।

कोल्हापूर क्षेत्री । मुक्त केले जन ।
अस्पृश्यतेतून । शाहू राजे ।।६।।

राजे बहुजन । सर्वांना शिक्षण ।
बोर्डिंग स्थापन । संस्थानात ।।७।।

शाहुंच्या कार्याला । करितो नमन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ।।८।।

 

लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा