दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या रक्षाबंधनानिमित्त कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले लिखित काव्यरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
रक्षाबंधन…
बहीण राखी प्रेमाने बांधते ।
भाऊ बहिणीचे करितो रक्षण ।
भावाच्या प्रेमाची ही साक्ष ।
भाऊ बहिणीचे रेशमी बंधन ॥
हाताला रेशमी हा धागा ।
सुख-दुःखाचा असे सोबती ।
भाऊराया देई ओवाळणी ।
भाऊ बहिणीचे गीत गाती ॥
कधी भांडण,कधी रुसवा ॥
पण द्वयांच्याही मनात माया ।
बहिणीच्या रक्षणाची हमी ।
एकमेकांविषयी असे दया ॥
भाऊला लाभो आयुष्य उदंड ।
हीच बहिणीची असे शुभेच्छा ॥
राखी पीर्णिमेच्या शुभदिवशी ।
देई रक्षाबंधनाच्या सदिच्छा ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
समता गौरव पुरस्कार प्राप्त
कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.







1 thought on “रक्षाबंधन दिन विशेष…”
The VIP treatment here is amazing. I feel valued as a player and the games are fair. Definitely sticking with idvip123.