“ओंकाराची पालवी”
गणपती विवेकाचा ध्यास
गणपती सुखकर्ता खरा
गणपती माणूसकीचा ठेवा
गणपती आनंदाचा झरा
गणपती मंगलमूर्ती
गणपती बुद्धीचा सागर
गणपती सुखाचा सोहळा
गणपती भक्तीचा आदर
गणपती ज्ञानाची ज्योत
गणपती विवेकाचा दीप
गणपती श्रद्धेचा श्वास
गणपती संस्कारांचे रूप
गणपती ओंकाराचा नाद
गणपती वेदांचा अर्थ
गणपती शब्दांचा स्वामी
गणपती कलेचा समर्थ
गणपती विघ्नांचा नाशक
गणपती संकटांचा तारणहार
गणपती आशेचा किरण
गणपती कृपेची अमृतधार
गणपती मोदकाची गोडी
गणपती दुर्वांची हिरवाई
गणपती आरतीचा प्रकाश
गणपती मनाची ग्वाही
गणपती बुद्धीचे बळ
गणपती शक्तीचा झरा
गणपती प्रेमाचा सागर
गणपती मायेचा किनारा
गणपती मंगलाचा सूर
गणपती पावित्र्याची वाट
गणपती अंतरीचा प्रकाश
गणपती जीवनाची पहाट
गणपती शिवपुत्र महान
गणपती पार्वतीचा नंदन
गणपती गणांचा अधिपती
गणपती मनमंदिराचे स्पंदन
लेखक –
ॲड. नीता प्रफुल्ल कचवे
साहित्यिक तथा समुपदेशक
संस्थापक – बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती.
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.






