आदिशक्ती बहु. संस्थेचे तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनातील बहारदार कविसंमेलन थाटात संपन्न…

SHARE:

अमरावती – आदिशक्ती बहु. संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. त्यातील तिसऱ्या सत्रात परतवाडा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. राजाभाऊ धर्माधिकारी यांचे अधक्षतेखाली एक बहारदार कविसंमेलन पार पडले. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी सहभागी झाले होते. अतिथी श्री. नारायणराव अंधारे अकोला, डॉ. मंदा नांदुरकर, ॲड. नीता कचवे श्रीमती रजनी अकोलीकर (अमरावती) होते. कवी संमेलनाद्वारे जणू शब्दांची दिवाळी साजरी झाली.

 

सहभागी कवी पातूर येथील श्री. कृष्णराव घाडगे, नागपूर येथून प्रा. सुनीता गायकवाड, पुसद येथून सौ. सुरेखा मोगरे यांनी आपापल्या सुरेख रचना सादर केल्या. यांच्या शब्दशब्दातून भावभावनांची रंगपंचमी होत असल्याने श्रोत्यांची वाहवा मिळवली. सुप्रसिद्ध गझलकार सौ. पुष्पाताई दलाल यांनी “खाते विकून सारे भावूक माणसाला,लक्षात येत गेले तेव्हाच ठोकर रे” ही नितांत सुंदर गझल सादर केली. सुप्रसिद्ध गायिका सौ. भावना देशपांडे, “नाही कधी मी भासली ऐकली अन् ऐकली”, प्रा. डॉ. शर्मिला प्रभुणे यांनी आपल्या अप्रतिम रचना  गाऊन सादर केल्या. नांदेड येथील श्री. साईनाथ रहाटकर, धामणगाव रेल्वे येथील श्री. यशवंत पाटील, दर्यापूर येथील गणेश साखरे, गणेश खडके, प्रा.  डॉ. नेहा भटकर यांनी आपल्या विशिष्ट ढंगातील रचना सादर करून कधी हसवलं तर कधी डोळ्यातून पाणी आणले. श्रोत्यांची दाद मिळवली. स्वाती ताई टोपले व गणेश खडके, वीणाताई खेडकर, सीमा भांदरगे यांनी जणू आपल्या कवितेनी जणू श्रोत्यांच्या काळजाला बांधून ठेवले. 

यांच्या कविता लक्षवेधी होत्या. विलास ठोसर निवृत्त तहसीलदार, सीमेरेला देशमुख, राणी नागापुरे, प्रभाताई आवारे, डॉ. विद्या गावंडे, सचिन देशमुख, सुनील लव्हाळे, प्रभा आवारे यांनी आपापल्या कवितेतून प्रतिभेचा मळा फुलवला. यांनी वेगवेगळ्या आशयाच्या खूप सुंदर अशा रचना सादर केल्या. डॉ रमेश जलतारे, पुणे यांची “दयाघनारे आता काही उरले नाही हाती l  किती बरसला शेतामघुनी वाहून गेली माती ll” या  हृदयस्पर्शी कवितेला श्रोत्यांची प्रचंड दाद मिळाली.

विवेक सपकाळ यांची कविता “तू माझ्या सोबत असतेस” ही कविता खूप खूप भाव खाऊन गेली. अतिथिनी ओळी ओळीतून शब्दांचा सोहळा उलगडून दाखवला. वेगळ्याच ढंगात आपापल्या कविता सादर करून वातावरण काव्यमय करून टाकले. कवी संमेलनाचे अध्यक्ष, परतवाडा येथील सुप्रसिद्ध कवी श्री. राजाभाऊ धर्माधिकारी यांनी कविता रचना व सादरीकरणासाठी महत्वाच्या बाबी सांगितल्या व स्वतःची एक वर्हाडी कविता “अवघे मिळून खाऊ पुरणाची पोयी l मंग करू सारे जमके लंकेची होयी ll” गाऊन दाखवली. टाळ्यांचा कडकडाट अन वाहवाचा गजरात ज्येष्ठश्रेष्ठ कवी राजाभाऊ यांनी आपल्या कवितांचा नजराणा पेश केला.

कविसंमेलनाचे सुंदर सूत्र संचालन सुप्रसिद्ध कवयित्री सुनीता तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन आदिशकी बहु संस्थेच्या अध्यक्ष व आयोजक डॉ. शोभा गायकवाड यांनी केले.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा