असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्स (ACI), नागपूरच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा..

SHARE:

नागपूर : ‘असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्स’ (ACI), नागपूरच्या २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्ष डॉ. विराग मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली आणि “कनेक्ट, ग्रो अँड प्रॉस्पर” (Connect, Grow and Prosper) या ध्येयाखाली ही नवी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे.

नवीन पदाधिकारी :

अध्यक्ष : डॉ. विराग मिटकरी

उपाध्यक्ष : श्री. सोनू बुर्रेवार

सचिव : श्री. सतीश मोरे

सहसचिव : श्री. राहुल राय

खजिनदार : सौ. धनुश्री पातुरकर

तसेच कार्यकारी समिती सदस्यांमध्ये डॉ. सुरज अय्यर (IPP आणि AGB मेंटॉर), श्री. रजनीकांत बोंद्रे (ACI प्रवक्ते), श्री. मनोज तवाणी, श्री. राहुल सारोडे, श्री. दिपक घागरे, श्री. श्रीनिवास बिसाला, सौ. मेघना मार्चतवार, श्री. प्रफुल माकोने, श्री. दिनेश गौर, श्री. संतोष यादव आणि श्री. आमीर पटेल यांचा समावेश आहे.

नवीन कार्यकारिणीची प्रमुख उद्दिष्टे :

एकता आणि समन्वय : महाराष्ट्रातील सर्व कोचिंग इन्स्टिट्यूट्स आणि असोसिएशनना एकाच व्यासपीठावर आणणे.

सामान्य आव्हानांवर मात : कोचिंग इन्स्टिट्यूट्ससमोरील व्यावसायिक व प्रासंगिक समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करणे.

शासकीय प्रतिनिधीत्व : महाराष्ट्र शासन आणि विशेषतः शालय शिक्षण विभागासोबत सकारात्मक समन्वय प्रस्थापित करणे.

प्रस्तावित कोचिंग रेग्युलेशन ॲक्ट : विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करतानाच कोचिंग क्षेत्राच्या समस्या आणि सूचना शासनासमोर मांडणे.

गुणवत्ता आणि व्यावसायिक विकास : ज्ञानदान, नैतिक पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक मानकांमध्ये सुधारणा यांना प्रोत्साहन देणे.

कोचिंग क्षेत्राची एकता हीच सर्वात मोठी ताकद असून, शिक्षण संस्था आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यास संस्था कटिबद्ध आहे. ही नवीन निवडून आलेली टीम कोचिंग क्षेत्राच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा