
नागपुर – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला रेल्वेची मंजुरी मिळाली आहे, तर नाशिक ते मुंबई लोकल ट्रेन धावणार आहे, असे राज्यसरकारने म्हटले आहे. मुंबई ते नाशिक डायरेक्ट लोकल ट्रेन धावणार आहे. राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग होणार आहेत, यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला रेल्वेची मंजुरी मिळाली आहे. मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱे लाखो प्रवाशी व सर्व सामान्य नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातून नाशिक ते मुंबई अशी लोकल ट्रेन धावणार आहे.
मुंबईतून नाशिकला जाण्यासाठी आता एक्सप्रेस ट्रेनची वाट पहाण्याची गरज नाही. मुंबई ते नाशिक डायरेक्ट लोकल ट्रेन धावणार आहे. दोन नवीन रेल्वे मार्ग उभारले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला रेल्वेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे बहुचर्चित नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर मोठी सुधारणा होणार आहे. मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते मुंबईदरम्यान लोकल सेवा सुरू होण्यास गती मिळणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन ट्रेन साठीच्या स्लॉट समस्या मार्गी लागणार आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी मुंबई ते नाशिक लोकल ट्रेन सुरु करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱया लाखो प्रवाशांना या लोकल ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि नाशिक या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱया प्रवाशांना आता मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनवर अवलंबून राहावे लागणार नाही. मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर लवकरच मेमू शटल लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासन मुंबई ते नाशिक दरम्यान लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. कसारा घाटाच्या चढ-उतारांवर मेमू लोकल ट्रेनच्या क्षमतांची चाचणी घेतली जात होती. या चाचणीत अनेक महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची चाचणी घेतली जात आहे.
मुंबई नाशिक मार्गावर मनमाडदृकसारा आणि कसारादृमुंबई या सुमारे १३१ किलोमीटरच्या मार्गांवर दोन नवीन रेल्वेमार्गिका तयार करण्यास रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक कसारा लोकल सेवा सुरु करण्यात यावी, ही नाशिककरांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे. नाशिक-कसारा दरम्यान दोन नवीन रेल्वेमार्गिकांना मंजुरी मिळाल्याने नाशिकहून कसारा आणि कसाऱ्याहून मुंबई किंवा थेट नाशिकहून मुंबई अशी लोकल सेवा सुरु होणार आहे.
आतापर्यंतच्या चाचणीत कसारा घाट हा लोकल सेवेसाठी अडचणीचा ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत होते. परंतु, या निर्णयामुळे त्यावरही पर्याय शोधण्यात आल्याचे समजते. नाशिक कसारा रेल्वेमार्गावर पाडळी, वैतरणानगर, चिंचलेखैरे अशी नवीन रेल्वे स्थानके उभारली जातील. कसारा इगतपुरीदरम्यानच्या कामासाठी निधीही मंजूर झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाणाऱया रेल्वे मार्गिकेवर रेल्वेगाड्यांची अतिशय वर्दळ आहे. त्यामुळे अनेक ट्रेन तसेच दुसऱया एक्स्प्रेस ट्रेन कुठल्यातरी रेल्वे स्थानकात थांबवाव्या लागतात. या नवीन रेल्वे मार्गामूळे प्रवाशांची सोय होणार आहे.





