
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज १५ डिसेंबर २०२५ , आजचा वार रविवार आहे. डिसेंबर महिन्याचा हा दुसरा रविवार आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील त्यामुळे आनंदात भर पडेल.
वृषभ रास (Taurus)
आर्थिक स्थिती सुधारेल बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील.
मिथुन रास (Gemini)
संशोधन क्षेत्रात यश मिळेल महिलांनी स्वतंत्र वृत्तीला आळा घालावा.
कर्क रास (Cancer)
एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली म्हणून तुम्ही मान्य करणार नाही घरापासून लांब राहण्याचे योग येतील.
सिंह रास (Leo)
प्रकृतीला सांभाळावे श्वसनाचे विकार पाठीचे दुखणे असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कन्या रास (Virgo)
नोकरी व्यवसायात कर्तव्य आणि शिस्त यांना धरून राहिलात तर कोणालाही घाबरायचे कारण नाही.
तूळ रास (Libra)
आज थोडा आळशीपणा वाढेल पण कार्य मग्न कसे राहायचे हे एकदा मनाशी ठरवले तर इकडची दुनिया तिकडे कराल.
वृश्चिक रास (Scorpio)
परदेश गमनाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही.
धनु रास (Sagittarius)
महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील जीवनाकडे बघण्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी राहील.
मकर रास (Capricorn)
आज थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवायला लागेल.
कुंभ रास (Aquarius)
दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहिल्यामुळे थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces)
तुमच्या मनाविरुद्ध कोणी वागले तर तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी रयत रक्षक न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रयत रक्षक न्यूज कोणताही दावा करत नाही.)





