
अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा घाटात धक्कादायक घटना घडली आहे. चिखलदराच्या घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस उतारावर दरीत जात असताना गाडी अडवण्याच्या नादात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन प्रवाशांनी सुद्धा ती बस ट्रॅव्हलर अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये दोन प्रवासी सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं काय घडलं?
ट्रॅव्हलर बसमध्ये एकाला उलटी आल्याने त्या ठिकाणी सर्व प्रवासी खाली उतरले होते. तेव्हा गाडी उताराच्या दिशेने उभी केली असता ती गाडी उताराहून खाली थेट दरीत जात होती. तेव्हा ड्रायव्हरने त्या गाड़ीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती बस ड्रायव्हरच्या अंगावरुन गेली. यामध्ये ड्रायव्हरच्या जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन प्रवाशांनी सुद्धा ती बस ट्रॅव्हलर अडवण्याचा प्रयत्न केला असता दोन प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत.





