राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली दादागिरी, गोरक्षकाकडून जनावरांच्या गाड्या थांबवून पैसे वसुली…

SHARE:

नागपुर – राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली दादागिरी चालली आहे ,तर गोरक्षकाकडून जनावरांच्या वाहतुक गाड्या थांबवून पैसे वसुली करत आहेत ,असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी विधानसभेत केला आहे. बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांनी मोठा आरोप केला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकरी बांधवांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावरे विकू शकत नाही. राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दल व यांसारख्या अनेक टोळया राज्यात धुमाकूळ घालत आहेत, हे सिध्द झाले आहे. ते शेतकी बांधवांकडून पैसे वसूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याला भाजप आमदारांनी हरकत घेऊन विरोध केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात, तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते. ऐकले नाही, तर मारहाण केली जाते. एका 18 वर्षाच्या शेतकरी बांधवाला इतकी मारहाण केली की, त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकरी बांधवांना काही पैसे तरी मिळतात; पण आता या बनावट टोळया शेतकरी बांधवांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात. याविरोधात राज्यातील भाजपा कारवाई केली पाहिजे. ही वसुली थांबवली पाहिजे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोवंशाची ने आण करणारी वाहने अडवल्यास तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही. अहिल्यानगर येथे बनावट गोरक्षक बनवून लुटमार केलेल्या व्यक्तीविद्ध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळया गैरलाभ घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याविषयी शेतकरी संघटनेकडून तक्रारीही आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात 1 कोटी शेतकरी आहेत. एका शेतकरी बांधवांकडे १०  भाकड जनावरे असतील, तर प्रत्येकी ५०  रुपये प्रमाणे प्रतिदिन ५००  रुपये गायींसाठी द्यावे लागतील. असे पैसे देण्यासाठी राज्याची तिजोरी नाही. गोशाळा असतील, तर त्याचे रेकॉर्ड ठेवता येते. चुकीचे केले, तर त्याचे लेखापरीक्षण करता येईल. बनावट गोरक्षक लुटमार करत असतील, तर त्यावर बंधने आणली पाहिजे.

Leave a Comment

अधिक वाचा