जळगावमध्ये शाळेतील ९ वर्षीय मुलगी, ४ दिवसांपासून गायब, चाळीसगाव पोलिसांकडून तपास सुरू…

SHARE:

जळगाव – शाळेतील ९ वर्षीय मुलगी ४  दिवसांपासून गायब झाली आहे या प्रकरणात, चाळीसगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडेमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली ९  वर्षांची मुलगी शाळेत गेल्यानंतर घरी न परतल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी गेल्या ४  दिवसांपासून बेपत्ता असून नातेवाईकांसह पोलिसांकडून तिचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मूलगी शाळेत गेली पण परत घरी आली नाही, गावाच्या वेशीवर त्या मूलीचे दप्तर सापडले आहे. या प्रकरणाची दखल चाळीसगावचे आमदारानेही घेतली असून पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन, या आमदाराने पोलिसांनी सदर प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे निर्देश चाळीसगाव पोलिसांना दिले आहेत.

चाळीसगाव तालूक्यातील तरवाडे गावातील मूलगी चार दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता आहे, तर तिचे दप्तर हे गावाच्या वेशीजवळ सापडले आहे, जळगाव जिल्हयातील चाळीसगाव पोलीस आणि तिचे नातेवाईक शोध घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातून मूलगी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडेमध्ये ४  थी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली ९  वर्षांची मुलगी शाळेत गेल्यानंतर घरी न परतल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी शुक्रवारी १२  डिसेंबर २०२५  रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र कोणताही माहिती मिळाली नाही. अखेर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक आमदाराने तरवाडे येथील कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पोलिस प्रशासनाला तात्काळ व सखोल तपास करा अशी विनंती केली आहे. गावातील स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून शोधमोहीम राबवली जात असून विविध ठिकाणी तपास केला जात आहे.

ती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकत असून, सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर घरी न परतल्याने पालकांनी शोध घेतला, मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नाही, अशी माहिती समोर आली आहे. तिचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळले आहे, ज्यामुळे अपहरणाची शंका व्यक्त होत आहे.

विसंगत माहितीमुळे संशय वाढला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात तळ ठोकून तपास करत आहेत. शिक्षक आणि गावकऱी लोकांचेही जबाब नोंदवले जात आहेत. एका महिलेकडून मिळालेल्या विसंगत माहितीमुळे संशय वाढला आहे. ती मुलीला वेगवेगळया दिशांना जाताना पाहिल्याचे काही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे, त्यामूळे संशय वाढला आहे. पोलिस आता वेगवेगळया बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

परिसरात शोध घेण्यात येत असून, गावातील आणि आजूबाजूच्या भागातील लोकांशी संपर्क साधला जात आहे. तसेच, सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांद्वारे माहितीचे आवाहन करण्यात आले आहे. आज म्हणजेच १६  डिसेंबर २०२५  रोजी या घटनेला ४  दिवस उलटून गेले तरीही मुलीचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांकडून तपास तीव्र करण्यात येत असून, कोणतीही माहिती असल्यास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा