कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR ने किती कोटी रुपये मोजले?

SHARE:

ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीन वर आयपीएलच्या लिलावात तगडी बोली लागली. कॅमरॉन ग्रीनची २ कोटी रुपये मूळ किंमत होती. कॅमरॉन ग्रीनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता भिडले. यावेळी २५.२०  कोटी रुपयांना कोलकाताने खरेदी केली. आता कॅमरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने २  कोटी रुपयांना खरेदी केले. तर भारतीय क्रिकेटचा फलंदाज पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. आयपीएल २०२६  चा मिनी लिलाव अबू धाबी येथे सुरु आहे. आयपीएल लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण २३७.५५  कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल ७७  खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण ३५९  खेळाडू लिलावात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त ३१  परदेशी खेळाडूंनाच करार मिळू शकतो, तर लिलावात ११०  परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Leave a Comment

अधिक वाचा