हिजाब वादात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संजय निषाध्द यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल…

SHARE:

पाटना – मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी पटना येथील भर सभेत आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देत असताना मंचकावर एका मुस्लिम महिलेचा हिजाब ओढला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा देखील उपस्थित होते. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लखनौच्या कैसरबाग पोलिस ठाण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या नेतया सुमैया राणा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
एएनआयशी बोलताना सुमैया राणा म्हणाल्या की हे कृत्य एक धोकादायक उदाहरण मांडते. त्या म्हणाल्या कि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते एका महिलेचा हिजाब ओढताना दिसत आहेत. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे असे दिसून येते की ते त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना अशाच प्रकारचे कृत्य करण्यास प्रोत्साहन देत आहेत.

राणा यांनी उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही आक्षेप घेतला. राणांचे वकील मिशाम जैदी म्हणाले की ही घटना आणि त्यानंतरच्या टिप्पण्या गंभीर दंडात्मक तरतुदींच्या कक्षेत येतात. ते म्हणाले कि त्यांनी एका महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे. संजय निषाद यांनी जे वक्तव्य केले आहे ते धार्मिक भावना भडकवणारे आहे. कलम १५३अ अंतर्गत हे स्पष्टपणे दिसून येते, कारण तुम्ही जाणूनबुजून अशा कृत्यांमध्ये सहभागी आहात ज्यामुळे दंगली भडकू शकतात, अशांतता निर्माण होऊ शकते आणि राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.

या प्रकरणी एका स्थानिक वाहिनीशी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले की बुरखा काढल्याबद्दल इतका गोंधळ झाला होता, पण जर त्यांनी दुसरीकडे कुठेतरी स्पर्श केला असता तर काय झाले असते? ते देखील एक पुरुष आहेत नाही का? या विधानाला आक्षेपार्ह ठरवत सुमैया राणा यांनी संजय निषाद यांच्या विरोधात देखिल लखनौच्या कैसरबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला.

व्हिडिओमध्ये नितीश कुमार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्यासोबत मंचावर दिसत आहेत. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात घडली जिथे नवनियुक्त आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वाटली जात होती. जेव्हा नुसरत परवीन हिजाबने चेहरा झाकून आली होती, तेव्हा नितीशने विचारले कि हे काय आहे? यानंतर नितीश कुमार यांनी महिलेचा हिजाब ओढला.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका अधिकाऱयाने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब बाजूला खेचले, तर कुमार यांच्या शेजारी उभे असलेले मुख्यमंत्री सम्राट चौधरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या बाही ओढताना दिसले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

नितीश कुमार यांनी सोमवारी पाटना येथे एका कार्यक्रमात मंचावर बोलवून १२८३  आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र दिले. यामध्ये नुसरत परवीन या मुस्लीम महिला डॉक्टरांचाही समावेश होता. नितीश कुमार यांनी याच महिला डॉक्टरचा हिजाब हातांनी ओढला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नितीश कुमारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. नीतीश कुमार यांच्या या कृत्यावरून आरजेडीने हल्लाबोल केला आहे. नितीश बाबू आता १००  टक्के संघी झाले आहेत, अशी बोचरी टीका आरजेडीने केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि यूपीचे कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांच्याविरोधात या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा