ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला , १८ डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार…

SHARE:

मुंबई – ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला आहे, तर १८  डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंकडून युतीची उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची तारीख ठरली, १८ डिसेंबर ’या’ दिवशी घोषणा होणार आहे.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा कधी होते याकडे लागले आहे. उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणांमध्ये युतीचे संकेत दिले आहेत. मात्र अद्याप यासंदर्भात दोन्ही बाजूंनी अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आता निवडणुका जाहीर झाल्याने ही घोषणा लवकरच होणार असून, युतीचा मुहूर्त ठरल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून १८  डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार आहे. राज्यातील शिवसेना मनसे यूती होणार आहे. मुंबईत महायुतीला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एल्गार दिला आहे. मुंबईसह इतर महापालिकांमध्येही ठाकरे बंधू युती जाहीर कऱणार आहेत. ठाकरेंच्या एकीमुळे नाशिक पुणे संभाजीनगर सारख्या महापालिकांमध्ये चुरस वाढली आहे.
मनसेकडून मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. यादरम्यान मनसेकडून ११  आणि १२  जानेवारीला शिवाजी पार्क येथे सभा घेण्यासाठी पोलिसांकडे परवानगी पत्र देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून अजून कुठलाही निर्णय नाही. मुंबई महानगर पालिकेच्या प्रचार सभेसाठी मनसेने पत्र दिल्याची माहिती आहे. पालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याचे समजले आहे.

शिवाजी पार्क मैदानात प्रचाराची सांगता होणार आहे. ठाकरे बंधूंच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ठाकरे बंधू संयुक्त सभा घेण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदान शेवटच्या सभेसाठी मिळावा यासाठी महापालिकेकडे पत्र पाठवण्यात आले आहे. काल सायंकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका कार्यालयात शिवाजी पार्क मैदान १२  जानेवारीसाठी मिळावे यासाठी पत्र दिल्याची माहिती आहे. तर मनसेकडून ११  जानेवारीला मैदान मिळावे यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची सभा संयुक्तरीत्या घेण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी होणार? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला आहे. त्यावर राऊतांनी, “महायुती आहे ती एकत्र येणार सांगतात त्यांना प्रश्न विचारता का? आम्ही बघू ना? मी ज्या अर्थाने सांगतोय राज आणि उद्धव एकत्र येणार आहे. महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावे लागले आमची युती करा म्हणत, असा टोला महायुतीला लगावला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा येत्या आठवड्यात व्हायला हरकत नाही. नॉमिनेश, विड्रॉल प्रतिक्रिया ३०  तारखेला संपते. दोघे एकत्र येतात तेव्हा काहीतरी कार्यक्रम असेल ना? असे जागा वाटप आहे. अशी भूमिका आहे, असे ठरले असेल आणि लवकरच ते जाहीर होईल, असे राऊत म्हणाले आहे. जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे आणि सगळी गणिते सुटणार असा विश्वासू मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची पुन्हा जागा वाटपाबाबत आज बैठक पार पडणार आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर ठाकरे गटाकडून अनिल परब संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. दुपारी शिवतीर्थ निवासस्थानी संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असता तब्बल ४० मिनिटे या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा