
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज २१ डिसेंबर २०२५, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज पौष मासारंभ होत आहे. मार्गशीर्ष महिना संपून पौष महिन्याची सुरूवात होतेय. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज घरातील सर्वांनाच घर सजवण्यामध्ये आनंद वाटेल, घरातील वातावरणही आनंदी उत्साही राहील.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील, नवीन घर ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी विचार करायला हरकत नाही.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रकृतीला जपायला हवे, जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धीच्या झोतात याल, लेखकांच्या लेखन शैलीमध्ये एक वेगळाच अविष्कार दिसेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला आपल्या वागणुकीने सर्वांना जिंकून घेतील, तुमच्या वागण्यामध्ये कल्पकता व दृष्टेपणा चांगला राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी असलेल्या कलेचा अविष्कार इतरांना बघायला मिळेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुम्ही जसे बोलाल तसे वागल्यामुळे तुम्हाला मान मिळेल, गुढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अति भावनाप्रधान हवी, थोड्या मोडी स्वभावामुळे इतरांना गोंधळत टाकाल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज ज्या परिस्थितीत असाल त्याचा परिणाम जरा जास्तच मनावर होऊ शकतो, जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज थोड्या थोड्या गैरसमजामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, व्यवसायात हातात घेतलेली कामे पूर्णत्वाला जाणार नाहीत.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, दुसऱ्याच्या मनातील भावना ताबडतोब ओळखाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आर्थिक इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी आवश्यक तेवढा पैसा निश्चित हातात पडेल.
(टीप : वरील सर्व बाबी रयत रक्षक न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रयत रक्षक न्यूज कोणताही दावा करत नाही.)





