जेव्हा गिरीजा ओकचं आरस्पानी सौंदर्य पाहून खुद्द इमरान हाश्मी झालेलं दंग; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला ‘तो’ किस्सा…

SHARE:

मनोरंजन विश्व् – रातोंरांत नॅशनल क्रश बनलेली मराठी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या चर्चेत आहे. गिरीजा ओकनं अनेक मराठी सिनेमांसोबतच हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. सोशल मीडियावर गिरीजाच्या हलक्या आकाशी रंगाच्या साडीतल्या फोटोंनी धुमाकूळ घातला आणि अनेकांना तिची नव्यानं ओळख झाली. नॅशनल क्रश बनलेली गिरीजा आपल्या निखळ आणि सोज्वळ स्वभावासाठी ओळखली जाते. अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे काहीशा गोंधळलेल्या गिरीजानं अत्यंत संयमानं सर्वकाही हाताळलं. गिरीजाचे अनेक चाहते आहेत, पण एक वेळ अशी होती की, ज्यावेळी खुद्द बॉलिवूडचा सुपरस्टारही तिच्यावरुन नजर हटवू शकला नाही.

२००४ साली गिरीजा ओक आणि स्वप्नील जोशीचा ‘मानिनी’ हा सिनेमा आला होता. त्या सिनेमाच्या शूटनंतर गिरीजा दुबईवरुन भारतात येत असताना विमानात चक्क इमरान हाश्मी तिच्याकडे पाहत होता. याचा किस्सा दिग्दर्शिका, निर्मात्या कांचन अधिकारी यांनी सांगितला.

निर्मात्या कांचन अधिकारी नेमकं काय म्हणाल्या?
‘तरुण भारत’ ला दिलेल्या मुलाखतीत कांचन धर्माधिकारी म्हणाल्या, “२००४  साली मी ‘मानिनी’ पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. आम्ही तीन निर्माते होतो. तिघांनी मिळून पैसे जमवले आणि मानिनी केला. तो पहिलाच मराठी सिनेमा आहे, ज्याचं परदेशात शूट झालं… आम्ही दुबईला १२ दिवसांचं शूट केलं होतं. गिरीजा ओक जी आता तुमची नॅशनल क्रश आहे, ती तेव्हा सिनेमा होती. आम्ही दुबईवरुन येत होतो, तेव्हा विमानात इमरान हाश्मी होता. तो मर्डर सिनेमाचं शूटिंग करुन येत होता… गिरीजा तर तेव्हा कॉलेजमध्ये होती. तेव्हा तिचे सरळ लांबसडक केस होते. तजेलदार त्वचा, दिसायला अतिशय सुंदर होती. आजही आहेच. नॅशनल क्रश ती होणारच होती, कारण तेव्हा इमरान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता… त्यामुळे इमरान हाश्मीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच ना! माझ्या असिस्टंटनं येऊन मला सांगितलं की, ‘मॅडम, बघा तो तिच्याकडे पाहतोय’…”

“पण आज मला तिचं नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेलं पाहिलं आणि त्यावरच्या कमेंट्स वाचून मला वाईट वाटलं. मराठी माणूस आधी पाय खेचण्यातच उस्ताद असतो… अरे तुम्ही तिनं आधी काय काय काम केलंय, स्ट्रगल केलाय ते बघा… तिचं गौहर जान काय सुंदर नाटक आहे… तिनं कधीच चुकीचं काही केलेलं नाही… अंगप्रदर्शन करुन तिनं कधीच प्रसिद्धी मिळवलेली नाही. तुम्ही तिचं कौतुक केलं पाहिजे. आपली मराठी मुलगी त्या स्टेजवर पोहोचलीये त्याची स्तुती करा….”, असं दिग्दर्शिका, निर्मात्या कांचन अधिकारी म्हणाल्या.

Leave a Comment

अधिक वाचा