उत्तरप्रदेशात पुनर्विकासाच्या नावावर, महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा इतिहास उद्धवस्त

SHARE:

उत्तरप्रदेश – उत्तरप्रदेशात पुनर्विकासाच्या नावावर, महाराष्ट्रातील पुण्यश्लोकअहिल्याबाई होळकरांचा इतिहास उद्धवस्त करण्यात आला आहे. आज ज्या महाराष्ट्र राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरु आहे, त्याच मराठीचा, अहिल्याबाईंचा होळकरांचा इतिहास वाराणसीत उद्ध्वस्त करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात पुनर्विकासाच्या नावावर, महापुरूषांच्या इतिहासाची तोडफोड केली जात आहे. याप्रकरणावरून उत्तप्रदेश व बिहार मधील पाल समुदाय आक्रमक झाला आहे.

उत्तरप्रदेशात पुनर्विकासाच्या नावावर, अहिल्याबाईं होळकरांचा इतिहास वाराणसीत उद्धवस्त केला आहे. वाराणासीत महास्मशानावर विकास विरुद्ध वारसा असा संघर्ष पाहिला मिळत आहे, तर मराठा इतिहासातील अहिल्याबाई होळकर व मराठ्यांचा इतिहास उद्धवस्त केल्यामूळे देशभरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तरप्रदेश राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर याच वाराणसीचे ऐतिहासिक रूप येत्या काळात बदलणार आहे. अहिल्याबाईं होळकरांचा इतिहास वाराणासीत उद्धवस्त केल्यामूळे , राज्यातील स्थानिक पाल समुदायांपासून पर्यटकांपर्यंत अनेकांनी उत्तरप्रदेश राज्यातील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी इतिहासातील अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तींची पुनर्स्थापना, उत्तरप्रदेश राज्यातरील भाजपा सरकारने पूर्ण आदराने केली नाही, तर उत्तरप्रदेशात आणि देशभरातील इतिहासप्रेमी नागरिक व स्थानिक पाल समुदाय मोठे आंदोलन करणार आहे, असे पाल समुदायातील नागरिकांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशातील वाराणसी ही देशातील सर्वात जुन्या शहरांचा मान मिळालेले हे ठिकाण आहे. येथील अध्यात्म आणि धार्मिक वारशामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. वर्षभर या वाराणसीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, येत असतात. मात्र याच वाराणासीचे ऐतिहासिक रूप येत्या काळात बदलणार असून, त्यासाठी स्थानिकांपासून पर्यटकांपर्यंत अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

मागील काही दिवसांपासून वाराणसीत पुनर्विकासाच्या नावावर, महास्मशान मणिकर्णिका घाट येथे, ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या ठिकाणी भाजपा प्रशासनाने बुलडोझर चालवत प्राणि चौथरा उद्धवस्त केला. चौथऱ्याला लागून असणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीसुद्धा तोडफोड झाल्याची दृश्य समोर आली आहेत.आणि सोशल मीडियावरही उत्तरप्रदेशातील भाजपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य म्हणजे येथे महाराष्ट्रात एकिकडे मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच, तिथे उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या इतिहासाला धक्का पोहोचला असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच, येथे पाल समुदायाच्या अनेक नागरिक घटनास्थळी दाखल होत, आंदोलनास सुरुवात केली आहे. ज्यानंतर पोलीस यंत्रणांनी विरोधकांना अडवण्यासाठी कारवाई केली. येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मूर्तींची पुनर्स्थापना पूर्ण आदराने केली नाही, तर मोठे आंदोलन पुकारू असे आव्हानच पाल समुदायानी दिल्यानंतर या उत्तरप्रदेशातील राज्यातील भाजपा प्रशासनाने त्यावर सारवासारव करणारी उत्तरे दिली आहेत. माहितीनुसार उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसीमध्ये या ठिकाणी २५ कोटी रुपयांच्या पुनर्विकासाच्या नावावर ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आल्या आहेत असे उत्तरप्रदेश राज्यातील प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा