राशीभविष्य – आज १८ जानेवारी २०२६ , आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
आज थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा वेळी महत्त्वाचे निर्णय लवकर घ्या.
वृषभ रास (Taurus)
आज सकारात्मक भूमिका घेऊन कामाला गती द्या महिलांना चैनीचे जीवन जगण्याचा मोह होईल.
मिथुन रास (Gemini)
भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल लेखकांनी आपली लेखणीतून प्रबोधनात्मक लेखन करावे.
कर्क रास (Cancer)
प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश येईल आरोग्य मात्र सांभाळावे लागेल.
सिंह रास (Leo)
आपण घेत असलेल्या औषध चुकीचे नाही ना त्याची मुदत संपली नाही ना अशा गोष्टी बघून घेणे गरजेचे आहे.
कन्या रास (Virgo)
कलाकारांसाठी चांगले ग्रहमान आहे महिलांना पिढी मधील तफावत जाणवेल.
तूळ रास (Libra)
तुमच्या अंगातील धाडस आणि तुम्हाला असलेले ज्ञान याचा योग्य समतोल साधतात तर कामाच्या बाबतीतील यश पदरात पडेल.
वृश्चिक रास (Scorpio)
व्यवसाय नोकरीमध्ये कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा.
धनु रास (Sagittarius)
घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn)
वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल त्यामुळे थोडी शांतता मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
संततीच्या बाबतीत त्यांचे वागणे न आवडल्यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल.
मीन रास (Pisces)
महिलांना तडजोड करावी लागेल खूप संवेदनशील स्वभाव ठेवू नये.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





