समाजवादी पार्टी चे अध्यक्ष अखिलेश यादवांनी ईव्हीएमवर पुन्हा प्रश्न उपस्थित करत, मतदार यादीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात नेण्याचा दिला इशारा

SHARE:

नवी दिल्ली – पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यापूर्वीच समाजवादी पार्टीचे मुखिया आणि खासदार अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की जरी सपा उत्तर प्रदेशातील सर्व ८० लोकसभा जागा जिंकली तरी मला ईव्हीएमवर विश्वास नाही. जर्मनी, जपान, अमेरिका यासारख्या विकसित देशांमध्ये निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातात. मात्र येथील गरीब लोक जागरूक नाहीत, ते शिक्षित नाहीत.

समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केला आहे. भविष्यातही त्यांचा पराभव करेन, असही ते म्हणाले.
निवडणुकीपूर्वी, विशेष सघन सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेचा भाग म्हणून मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. खासदार अखिलेश यादव यांनी याबद्दल शंका व्यक्त केली आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोपही केला. ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे व्हिजन इंडिया नावाच्या कार्यक्रमात बोलत होते.

अखिलेश यादव यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखिलेश यादव म्हणाले कि मी असे म्हटले आहे की, जर जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरून निवडणुका घेतल्या गेल्या तर ते असंवैधानिक मानले जाईल. अमेरिकेत पर्याय उपलब्ध आहे. ईव्हीएम जपानमध्ये बनवले जातात पण तिथेही मतदानासाठी वापरले जात नाहीत. मात्र येथील गरीब लोक जागरूक नाहीत, ते शिक्षित नाहीत त्यामुळे भारतात ईव्हिएमवर निवडणुकी घेतल्या जातात.

निवडणूक पारदर्शकतेच्या मुद्द्यावर समाजवादी पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल असे त्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर, मंदिरे पाडण्याच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त मंदिरे पाडण्यात आली. प्राचीन मंदिरे पाडली जात आहेत पण मीडिया भाजपशी संगनमत करत असल्याने आपण काय करू शकतो. अखिलेश यादव म्हणाले की ते कायदेशीर टीमला एसआयआरबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगतील, जेणेकरून हे स्पष्ट होईल की राज्य निवडणूक आयोगाची किंवा भारतीय निवडणूक आयोगाची मतदार यादी बरोबर आहे.

सपा प्रमुख म्हणाले की, निरोगी भारत हा नारा नसून एक मिशन असावे. आम्हाला गरिबांसाठी मोफत उपचार हवे आहेत. समाजवादी सरकारच्या काळात गरिबांना त्यांचे कार्ड दाखवावे लागले नाहीत. रुग्णालयात उपचार मोफत होते. जर आपण विकसित भारताचा नारा देत आहोत, तर अमृत काळ चालू असताना, आणि एखाद्याला कार्डमुळे उपचार मिळत नसेल तर हे योग्य नाही. भाजप सरकारच्या काळात महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. वीज, सिंचन आणि खते सर्व महाग झाले आहेत. शेतीचा खर्च वाढत आहे, परंतु सरकार उत्पादनाला योग्य किंमत देत नाही. भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते प्रत्येक आघाड्यावर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की भाजप सरकारच्या काळात अन्याय आणि अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. भाजप सरकारच्या काळात कफ सिरपमध्ये घोटाळा झाला होता. नोटाबंदीमध्ये घोटाळा झाला होता. गंगा मातेच्या स्वच्छतेमध्ये घोटाळा झाला होता. त्याचप्रमाणे भाजपचे लोक एसआयआरमध्ये घोटाळा करू इच्छितात, असा हल्लाबोल अखिलेश यादव यांनी भाजपवर केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा