नागपूर – नागपुरमध्ये सुपारी व्यापाराशी संबंधित, २० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी धाड टाकण्यात आली आहे, तर नागपुरमध्ये आयकर विभागाकडून, सुपारी व्यापार्यांवर मोठी कडक कारवाई कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच, नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. तर या अचानक झालेल्या आयकर विभागाच्या कडक कारवाईनंतर, व्यापार्यांची पळापळ झाली आहे. शनिवारी नागपुरमध्ये आयकर विभागाच्या पथकाने, नागपुरातील सुपारी व्यापाराशी संबंधित, २० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली आहे, आणि नागपुर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या अचानक झालेल्या कारवाईमुळे नागपुर शहरातील, व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, सुपारीच्या बेकायदेशीर व्यापारात, सहभागी असल्याचा संशय असलेल्या, काही नामांकित व्यापाऱ्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राजू अण्णा उर्फ राजेश शिनॉय, अलताफ कलीवाला, आसिफ कलीवाला, गनी कलीवाला यांच्यासह काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांचे मुंबईतील सुपारी व्यापारी, फारूक भाई यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा आहे. त्याच माहितीनुसार आयकर विभागाने ही कडक कारवाई केली आहे.
शनिवारी आयकर विभागाची मोठी टीम नागपुर शहरामधील शांतिनगर, कामठी रोड, कळमना परिसर आणि इंडस्ट्रियल एरिया येथे सक्रिय होती. राजू अण्णा यांच्या निवासस्थानासह, कलीवाला बंधूंची कार्यालये व गोदामांमध्ये, आयकर विभागाकडून तपास करण्यात आला आहे. याशिवाय इतवारी आणि जागनाथ परिसरातील सुपारी व्यापाराशी संबंधित, दुकानांवरही आयकर पथकाने धाड टाकली आहे. तर या कडक कारवाईत, नागपुर शहर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त, ठेवण्यात आला होता.
नागपुर शहरामध्ये एके-४७ शस्त्रांनी सज्ज, सुरक्षा कर्मचारी आणि डॉग स्क्वॉडच्या उपस्थितीमुळे, परिसरात तणावपूर्ण शांतता होती. नागपूर हे मध्य भारतातील सुपारी व्यापाराचे, प्रमुख केंद्र मानले जाते. येथून मोठ्या प्रमाणावर सुपारीचा पुरवठा, विविध राज्यांमध्ये केला जातो, ज्यामध्ये तंबाखू, मावा आणि गुटख्याच्या निर्मितीसाठी वापरल्या, जाणार्या सुपारीचा समावेश असल्याचा संशय आहे. नागपुरमध्ये आयकर विभागाला या सुपारी व्यापारातून मोठ्या प्रमाणावर, करचुकवेगिरी आणि काळ्या पैशाचा व्यवहार झाल्याचा संशय आहे.
मात्र, नागपूरमधील छाप्यांमध्ये नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच, या कारवाईतील खरी परिस्थिती समोर येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या आयकर विभागाच्या, अचानक कडक कारवाईमुळे नागपूरच्या व्यापारी क्षेत्रात, मोठी चर्चा सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणात अधिक तपास आयकर विभाग आणि नागपुर शहर पोलिस करत आहेत.





