मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत १३० महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत, तर मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महिलांचा आवाज घुमणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत, पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत मुंबईत १३० महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत केवळ पुरुष नगरसेवकांची संख्या ९७ एवढी आहे.
मात्र, मागील महापालिका निवडणुकीत महिला नगरसेवकांची संख्या ही १३३ होती. त्यामुळे मुंबईत महापालिकेत महिला नगरसेवकांची संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीतील संख्येपेक्षा तीनने कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महिलांचाच आवाज घुमणार आहे. आता महापालिकेत अनुभवी महिला नगरसेवक आणि नव्याने निवडून आलेल्या महिला नगरसेवक असणार आहेत. नगरसेवक पदाच्या माध्यमातून सभागृह आणि विशेष समित्यांमध्ये मुंबईतील १३० महिला नगरसेविका चमक दाखवणार आहेत. आता या १३० नगरसेविका ,मुंबईच्या विकासासाठी किती प्रयत्न करतात हे पाहायला मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांसाठी, ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्याने ११४ महिलांकरता प्रभाग राखीव होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील, ११४ जागांवर महिला नगरसेवकांना उमेदवारी मिळून, त्याठिकाणाहून महिला नगरसेवक निवडून येणे अपेक्षित असते. त्यामुळे महापालिकेत २२७ पैंकी ११४ नगरसेवक हे महिला निवडून येतातच. परंतु मुंबई महापालिकेत यावर्षी काही खुल्या प्रवर्गातूनही, महिलांनी निवडणूक लढवल्यामुळे, ११४ च्या तुलनेत महिला नगरसेवक निवडून येण्याची संख्या १३० एवढी झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी घेतलेल्या भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. भाजपचे ८९ नगरसेवक तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता असलेल्या उबाठाचे ६५ नगरसेवक आणि मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्याखालोखाल एआयएमआयएम पक्षाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र या २२७ नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या १३० एवढी आहे. तर मागील २०१७ च्या निवडणुकीत, महापालिकेत निवडून आलेल्या महिला नगरसेवकांची संख्या १३३ एवढी होती.
यावेळी निवडून आलेल्या महिला नगरसेवकांची संख्या भाजपामध्ये सर्वाधिक आहे. भाजपाचे निवडून आलेल्या ८९ नगरसेवकांपैंकी ४९ महिला नगरसेवक आहेत. तर उबाठाचे ३८ महिला नगरसेवक निवडून आले आहेत. उबाठाच्या निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांपैंकी ३८ महिला नगरसेवकांचा समावेश आहे.
तर शिंदेगट शिवसेनेच्या २९ नगरसेवकांपैंकी १९ नगरसेवक या महिला आहेत. तर काँग्रेसच्या २४ पैंकी ११ महिला नगरसेवक, एआयएमआयएमच्या ८ पैकी ५, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ पैंकी ५ अशाप्रकारे महिला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आता राज्यातील सर्वात मोठी असलेल्या, मुंबई महानगरपालिकेत एकुण सर्व मिळुन १३० महिला नगरसेविका निवडुन आल्या आहेत, त्यामूळे मुंबई महानगरपालिकेत सभागृहात १३० महिला नगरसेवकांचा आवाज घुमणार आहे. मुंबई महापालिकेत आता महिला नगरसेवक या आपल्या अभ्यासू आणि विविध विषयांवर बोलणार आहेत.





