मुंबई – मुंबईत अल्पवयीन मूलीच्या अंगावर, स्पीकर पडल्यामूळे मृत्यू झाला आहे. मुंबईत ही घटना विक्रोळी मध्ये घडली आहे. विक्रोळीमध्ये स्पीकर अंगावर पडून ३ वर्षीय लहान मूलीचा मृत्यू झाला आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुंबई शहरातील उपनगरात लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान मूलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. पालकांना शहरी भागात लहान मूलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मुंबईसह देशभरात सर्वत्र ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रम, किंवा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. होते. मुंबईत मात्र, काल विक्रोळीत अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे कारण, बेसावधपणामूळे काल मुंबईत एका अल्पवयीन मूलीचा जीव गेला आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल २६ जानेवारी २०२६ रोजी, एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये असणाऱ्या आंबेडकर नगर येथे परिसरात, प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला एक स्पीकर, साधारण ३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर पडला आणि या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. काही सेकंदांत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विक्रोळी परिसरात ही घटना घडली आहे.
माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त विक्रोळीच्या आंबेडकर नगरमध्ये, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी येथील परिसरात मोठे स्पीकरही लावण्यात आले होते. तेव्हात छोट्याशा वाटेवरून लोकांची नेहमीची ये-जा सुरू असताना, एक अल्पवयीन मूलगी खेळता खेळता धावत आली, आणि रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला मोठा स्पीकर, तिच्या अंगावर पडला. या अपघातात अल्पवयीन मूलगी गंभीररित्या जखमी झाली. नंतर लगेचच तिथे असणाऱ्या नागरिकांनी, तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी अल्पवयीन मूलीला मृत घोषित केले आहे.
विक्रोळीतील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये आता नेमकी चूक कोणाची? हाच प्रश्न समोर येत आहे. ४० सेकंदांच्या या व्हिडीओच्या सुरुवातीला रस्त्यावर नियमित ये-जा करणारी माणसे दिसत आहेत. ही अल्पवयीन मूलगी स्पीकर पडत असतानाच त्याखाली आल्याने, तिच्या अंगावरच स्पीकर पडून अपघात झाला आहे. लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी जातात तेव्हा, त्यांच्यावर घरातल्या व्यक्तींचे लक्ष असावे नाहीतर, अशा अपघाताच्या घटना होत आहेत.





