रायगड – वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे आणि महापुषांविरोधात गरळ ओकणारे संभाजी उर्फ मनोहर भीडे यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि रुरुरुखोर आहेत, अशी जहरी टीका संभाजी भीडे यांनी शरद पवारांवर केली आहे.रायगड जिल्हयात यात्रेदरम्यान भीडेंनी ही टीका केली आहे.
संभाजी भिडे सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्यांची रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील लोहगड, भीमगड अशा गडकिल्ल्यांसाठी धारातीर्थी यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यानच माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि रुरुरुखोर आहेत. असे वादग्रस्त वक्तव्य भिंडेंनी शरद पवारांबद्दल बोलताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भीडेंच्या या जहरी टीकेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. एनसीपी शरद पवार गटाचे नेते महेश तपासे म्हणाले कि वादग्रस्त वक्तव्ये आणि संभाजी भिडे यांचं पूर्वजन्माचं काहीतरी नातं मला दिसत आहे. एकीकडे तरुणांची माते भडकवायची, कुठेतरी इतिहासाचे चुकीचे संदर्भ द्यायचे, आणि ज्याने पराक्रम घडवला, त्यांना उद्देशून काहीतरी वक्तव्ये करायची हे एक फॅशन झालेली आहे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. पण संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य चुकलं आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते विकास पासलकर म्हणाले कि या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मी आताच थोड्या वेळापूर्वी संभाजी भिडे यांचं वक्तव्य ऐकलं. महाराष्ट्राचं मान शरमेनं खाली जाईल अशाप्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या वक्तव्याची दखल घेऊन भीडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.





