खेळ– टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून संजू सॅमसन याला वगळणयाची दाट शक्यता आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या ५ सामन्याच्या टी २०i मालिकेतील पहिल्या ४ सामन्यात फ्लॉप ठरला. संजूला या ४ सामन्यात मोठी खेळता करता आली नाही. टीम मॅनेजमेंटने संजूला अपयशानंतरही संधी देत विश्वास दाखवला.मात्र संजू विश्वात जिंकण्यात अपयशी ठरला. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा ३१ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. संजू सॅमसन याला या पाचव्या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेत ३ -१ अशा फरकाने आघाडीवर आहे. भारताने सलग आणि पहिले 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. तर न्यूझीलंडने चौथ्या टी २०i सामन्यात पहिलावहिला विजय मिळवला. संजूने या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये एकूण ४० धावा केल्या. तसेच संजूला या ४ पैकी फक्त २ सामन्यांतच दुहेरी आकडा गाठता आला. संजूने पहिल्या 4 सामन्यांत अनुक्रमे १०,६,० आणि २४ अशा धावा केल्या. संजूला चौथ्या सामन्यात विशाखापट्टणममध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र संजूला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे पाचव्या सामन्यातून संजूला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे.
लोकल बॉय संजू कायम राहणार की आऊट होणार?
तिरुवनंतरपुरम संजूचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे संजूला आपल्या घरच्या मैदानात आणि वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी आहे. मात्र सलग ४ वेळा संधी दिल्यानंतर निवड समिती संजूवर कितपत विश्वास दाखवणार? हा देखील प्रश्न आहे. संजूला गेल्या १५ डावांत फक्त एकच अर्धशतक झळकावता आलं आहे.
कुणाला संधी-कुणाला डच्चू?
संजूला वगळल्यास त्याच्या जागी इशान किशन याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच रवी बिश्नोई याच्या जागी वरुण चक्रवर्ती याचा समावेश केला जाऊ शकतो. वरुण गेल्या २ सामन्यांपासून प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, शिवम दुबे, रिंकू सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी २०i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर ६ वाजून ३० मिनिटांनी टॉस करण्यात येईल.





