राज्यात वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर, १८ फेब्रुवारीपासून कडक कारवाई होणार

SHARE:

मुंबई – राज्यात वाहनचालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर, १८ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यातील वाहनचालकांवर कडक कारवाई होणार आहे, असे राज्यसरकारने म्हटले आहे. राज्यातील सरकारी विभागाने महत्वाचे आदेश दिले आहेत. वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही तर आता कडक कारवाई होणार आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी महत्वाची सुचना राज्यसरकारने दिली आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे नुकसान होईल. तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर, आताच बसवुन घ्या ज्यांनी ही नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्य सरकारने ही नंबर प्लेट बसवून घेण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख दिली होती, मात्र असे असूनही अनेक गाडयांना नंबर नंबर प्लेट नसल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात येताच, त्यांनी आता कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट गाड्यांना बसवली नसेल तर, १८ फेब्रुवारी २०२६ पासून वाहन चालकांवर कारवाई होणार आहे. राज्यसरकारने वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले होते. अनेकांनी अजूनही हे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूली केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीपासून वाहनांवर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश परिवहन आयुक्त यांनी दिले आहेत.

राज्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरामध्ये लाखो वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. जवळपास २४ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक होते. मात्र, फक्त आठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. जवळपास ६५ टक्के वाहनधारकांनी अजुनही एचएसआरपीनंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच आता राज्यातील हा वाहनांवर कारवाई होणार आहे, असे राज्यसरकारने म्हटले आहे. राज्यात वाहनचालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास रोख रक्कम दंड भरावा लागणार आहे. राज्यात एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास वाहनचालकांना, १,०००  ते १०,०००  रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे, असे राज्यसरकारने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा