गुजरातमध्ये बेकायदेशीर देहव्यापार आणि सेक्स रॅकेटचा भांडाफोड; गुजरात पोलिसांची मोठी कार्यवाही

SHARE:

गुजरात – बेकायदेशीर देहव्यापार आणि सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांना या ठिकाणी काहीतरी संशयित काम चालते अशी टीप मिळाली होती. यानुसार गुजरात पोलिसांनी आधी या ठिकाणाची रेकी केली आणि त्यानंतर त्यांनी धाड टकाली आहे. धाड टाकली असता आतमध्ये सापडलेल्या गोष्टी पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. हा गुजरात राज्यामधील मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टीपच्या आधारे पोलिसांची छापेमारी केली आहे. या ठिकाणी काही संशयित महिला दिसून आल्या आहेत.

गुजरातच्या सूरत शहरामध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. येथील पालनपूर पाटिया परिसरामध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचे मोठे नेटवर्क उद्धवस्त गुजरात पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. पोलिसांकडून ही कडक कारवाई राज वर्ल्ड शॉपिंग सेंटर नावाच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका स्पामध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला तेव्हा आतमध्ये पडलेले साहित्य, संशयित वस्तूंचा ढीग पाहूनच पोलिसांना धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये ५ जणांना अटक केली आहे. देहविक्रेता व्यवसायासाठी आणलेल्या ४ महिलांना पोलिसांनी वाचवले आहे.

सुरतमध्ये पालनपूर गावातील राज वर्ल्ड शॉपिंग सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली बेकायदेशीर देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवले जात होते. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन ७ च्या एलसीबी टीम आणि पोलिसांच्या अन्य विभागाने एकत्र या ठिकाणी धाड टाकली आहे. पालनपूर याठिकाणी धाड टाकली असता छोट्या आकाराच्या खोल्यांमध्ये संशयित महिला दिसल्या आहेत.

पोलिसांच्या चौकशीत माहिती मिळाली की, महिलांचे फोटो मोबाईलवरुन पाठवून या स्पामध्ये ग्राहकांना आणले जायचे. सुरत पोलिसांनी या स्पामधून असे ११ मोबाईल जप्त केले आहेत. ज्यांच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क केला जायचा. यापैकी ७ मोबाईल हे स्पा सेंटरमधील होते, तर ४  मोबाईल ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरले जात होते. याप्रकरणात पोलिसांना काही रोख रक्कमही सापडली आहे. एका खोलीत लाइट बील, इतर कागदपत्रे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांना ४ छोट्या आणि १ मोठी डायरी मिळाली आहे.

या डायरीमध्ये संशयित महिलांची नाव, ग्राहकांची नावे, पैसे , हिशोब मांडला होता. पोलिसांना वेगवेगळ्या रंगांचे ४० टोकनही या ठिकाणी सापडले. टोकनच्या माध्यमातून पैशाचा व्यवहार व्हायचा. माहितीनुसार, स्पा चालकांनी आपण पकडले जाऊ नये म्हणून खबरदारी घेत होते. स्पाच्या आत आणि बाहेर तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या आढळून आले. सीसीटीव्हीचं रेकॉर्डींग साठवले जाणारे डीव्हीआरही जप्त करण्यात आले आहे.

या सुरतमधील पालनपूरच्या सेक्स रॅकेटमध्ये स्पा मॅनेजर शुभ्रे बाबूराव चक्रवर्ती आणि सहाय्यक विपिन उर्फ रिंकु जगदीश शाहू यांचा समावेश आहे. तर दीपकभाई शाह, वीरसिंह शांतिजी कोली, उमेश दिलीप शर्मा यांना अटक केली आहे. स्पाचा मालक आकाश अंकुशभाई पळून गेला आहे. याप्रकरणात अधिक तपास सूरत पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा