बेंगलोर – कर्नाटकमध्ये नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक राज्यात महिला मुख्याध्यापकाने सासर्याविरोधात ६ वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे. कर्नाटकमध्ये मुख्याध्यापक असलेल्या सुनेसोबत सासर्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यात बेंगलोर येथे ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित पदावर काम करणार्या मुख्याध्यापक असलेल्या, महिलेला स्वतःच्याच घरात छळाचा सामना करावा लागला आहे. ही घटना बेंगलोरमध्ये घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक छळ केल्याचा प्रकार आता समोर आला आहे.
यामुळे कर्नाटकातील शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. बेंगलोरमधील एका महिलेने तिच्याच सासऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमूळे बेंगलोरमधील स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रकरण कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोर शहरातून समोर आले आहे. येथील नॉर्थ बेंगलोर भागात राहणाऱ्या एका खाजगी शाळेच्या महिला प्रिन्सिपलने आपल्या सास्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मागील ६ वर्षांपासून सासरा आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या महिलेचा सासरा असलेला आरोपी याने मागील ६ वर्षांपासून शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या महिलेचा शारिरिक व मानसिक छळ केला आहे. ही पीडित महिला २००७ पासून शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून एका प्रसिद्ध शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली आहेत. मात्र २०२० पासून तिच्या सासर्याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. पीडित महिला घरी एकटी असायची, तेव्हा तिचा सासरा घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे आणि शारीरिक शोषण करत होता, असा गंभीर आरोप या मुख्याध्यापक महिलेने केला आहे.
आपल्यासोबत घडणारा हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना त्रास देऊ अशी धमकी आरोपी सासरा वारंवार देत होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी ही मुख्याध्यापक महिला इतके दिवस गप्प राहिली होती. परिस्थिती कधीतरी सुधारेल अशी तिला आशा होती, परंतु सासर्याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच होता. आता काही दिवसांपुर्वी या मुख्याध्यापक महिलेने आतापर्यत घडलेला हा सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला आहे. त्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींनी मध्यस्थी करून आरोपी सासर्याला ताकीद दिली होती, ज्यामुळे काही काळ हा त्रास थांबला होता. या मुख्याध्यापक महिलेला घरातच नाही तर पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणी शाळेत जाऊनही आरोपी सासर्याने तिला शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
शाळेच्या केबिनमध्ये आणि अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासऱ्याने अनेकदा शारिरिक व मानसिक छळ केल्याचे महिलेने तक्रारीत लिहिले आहे. आरोपी सासरा तिला वारंवार अश्लील मजकूर असलेली हाताने लिहिलेली पत्रे द्यायचा, आणि ती वाचायला लावून पुन्हा स्वतःकडे परत घ्यायचा. आरोपी सासर्याकडून हा शारिरिक वा मानसिक छळाचा सर्व प्रकार २०२० पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता. या प्रकरणात आरोपीने महिलेला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ही मुख्याध्यापक महिला कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती, तेव्हा अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्याने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.
जेव्हा या मुख्याध्यापक महिलेने याला विरोध केला, तेव्हा संतापलेल्या आरोपी सासऱ्याने तिच्या पोटावर जोरात मारले होते, व तिथून पळ काढला होता. आरोपी सासर्याच्या या रोजच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने बेंगलोर पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. नंतर या आरोपी सासर्याविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बेंगलोर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. व तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात येताच, कर्नाटक राज्य महिला आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
कर्नाटक राज्यातील शिक्षण क्षेत्रातील एका जबाबदार पदावर असलेल्या मुख्याध्यापक महिलेला, जर घरातच अशा संकटाचा सामना करावा लागत असेल, तर कर्नाटक राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक पोलीस सध्या या प्रकरणातील कुटुंबातील संबंधित व्यक्तींची ही चौकशी करत आहेत. कर्नाटक राज्यात शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदावर असलेल्या महिलाच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य महिलांच्या संरक्षणाचे काय होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात आजही स्वतःच्या घरातच महिला सुरक्षित नाही, असे चित्र कर्नाटक राज्यात पाहायला मिळत आहे.





