राज्यातील संलग्न महाविद्यालयांतील जुन्या अभ्यासक्रमांबाबत, मुंबई विद्यापीठाचा ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्याचा निर्णय

SHARE:

मुंबई – राज्यातील संलग्न महाविद्यालयांतील जुन्या अभ्यासक्रमांबाबत, मुंबई विद्यापीठाने एकूण ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर एकूण ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद केल्या आहेत. राज्यातील मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांमधील जुन्या अभ्यासक्रमांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मागील २  ते ३  शैक्षणिक वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही, तसेच जे अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा एकूण ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. शून्य नोंदणी असलेल्या १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या माहितीनुसार, मागील २  ते ३  वर्षांत कोणतीही विद्यार्थी नोंदणी न झालेल्या १२५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी संख्या कमी असल्यामूळे या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत, असे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे. राज्यातील मुंबई विद्यापीठाच्या या १२५ परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या २३ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या १५ परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या ४२ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ४५ परीक्षांचा समावेश आहे. या परिक्षांसाठी नोंदणी झाल्यास परीक्षा पुन्हा सुरू होणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. शून्य नोंदणीमुळे बंद करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांबाबत एक महत्त्वाची अट मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केली आहे.

भविष्यात जर राज्यातील कोणत्याही संलग्न महाविद्यालय किंवा संस्थेकडून या मुंबई विद्यापीठातील या जुन्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी नोंदणीचा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला, तर फक्त त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कार्यक्रम जाहीर करणे, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती आणि इतर सर्व परीक्षा प्रक्रिया मुंबई विद्यापीठाच्या नियमांनुसार पुन्हा सूरू करण्यात येतील, असेही मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील मुंबई विद्यापीठातील १० वर्षे पूर्ण झालेल्या १७९ परीक्षा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठातील काही जूना अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या जुन्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत मुंबई विद्यापीठाने कडक भूमिका घेतली आहे.

विद्यापीठातील १७९ जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जाणार नाहीत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासन व विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाने म्हटले आहे. मुंबई विद्यापीठातील या कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या १० परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ८६ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या ३८  परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या ४५ परीक्षा यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठातील काही जुने अभ्यासक्रम बदलण्यात आले आहेत, तर काळानुसार बदलती शैक्षणिक गरज लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम कालांतराने विद्यार्थी संख्येअभावी बंद पडले आहेत, तर विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलले आहे. आतापर्यंत मुंबई विद्यापीठामध्ये अशा अभ्यासक्रमांमध्ये पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून, परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र आता विद्यापीठात दीर्घकाळ बंद असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करून नवीन परीक्षा यंत्रणा अधिक पारदर्शक व अद्ययावत करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठ परीक्षा व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार आहे. तर विद्यापीठातील चालू आणि मागणी असलेल्या नवीन अभ्यासक्रमांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे, असे राज्यातील मुंबई विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा