कोल्हापूर जिल्ह्यात पाटगावचे माजी सरपंच गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड; पोलिसांना सर्व माहिती असून सुद्धा तपासात दिरंगाई होत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

SHARE:

कोल्हापूर – जिल्ह्यात पाटगावचे माजी सरपंच गेल्या २ महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. कोल्हापूर पोलिसांना सर्व माहिती देऊनही तपासामध्ये गती येत नाही, पोलीस आपल्याला कोणतीही माहिती देत नाहीत अशी तक्रार पिळणकर कुटुंबाने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटगावचे माजी सरपंच गेल्या २  महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मात्र त्यांचा अजून कोणताही तपास लागत नाही. पोलिसांना देखील तपासात अद्याप कोणतेच यश आले नाही.

त्यामुळे संबधित माजी सरपंचांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या २  महिन्यांपासून बेपत्ता आहेत. २ महिन्यांपासून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, मात्र अजून पिळणकर यांचे काय झाले हे समोर आले नाही. कुटुंबासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी पाटगाव भागात जळालेल्या अवस्थेत काही हाडे सापडली होती. मात्र त्याचा अहवाल येणे अजूनही बाकी आहे.

ती हाडे एखाद्या जनावरांची असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी महेश पिळणकर यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणात कोहापूर पोलिसांनी तपासाला वेग द्यावा अशी विनंती गावातील नागरिकांनी केली आहे. कोल्हापूर ग्रामीण पोलीस काहीही माहिती देत नाहीत.

कोल्हापूरच्या या पाटगाव माजी सरपंच बेपत्ता प्रकरणात आम्ही पोलिसांना सर्व मदत केली आहे, मात्र तपासात काहीच प्रगती नाही. हे प्रकरण गंभीर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे व गावातील नागरिकांनी म्हटले आहे. राजकीय बाजूंनी तपास करणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी पिळणकर यांच्या कुटुंबाला दिले आहे. महेश पिळणकर हे लोकप्रिय माजी सरपंच होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची ती तयारी करत होते.

त्यामुळे राजकीय आणि इतर सर्वच बाजुंनी तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र जोपर्यंत पिळणकर यांचा ठावठिकाणा लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे गावातील स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. कोल्हापूर मधील या प्रकरणात मोठा राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा