कोल्हापूरमध्ये आखातातील युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा, राजारामपुरीत तणावाचे वातावरण

SHARE:

कोल्हापूर – आखातातील युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा पडला आहे, तर कोल्हापूर शहरातील राजारामपुरीत तणावाचे वातावरण निर्माण झालले आहे.आखाती युद्धामुळे कोल्हापूरच्या राजारामपुरीत नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. तर लोकांमध्ये सरकारविरोधात संताप आणि वादावादीचे दृश्य पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले आहे. आखाती युद्धाची झळ आता भारताला तीव्र जाणवत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील काही राज्यात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.याचा फटका राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना बसताना दिसत आहे.

कोल्हापूर शहरातील राजारामपुरीत काही वादाचे प्रसंग झाले आहेत. कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने नागरिकांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर शहरामधील गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाद होत आहेत. परिस्थिती हाताळताना गॅस कर्मचाऱी वैतागलेले दिसून येत होते. आखातातील युद्धाची झळ भारताला बसत आहे.

युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलासह गॅसच्या किमती वाढल्या आहेत. भारतात गॅस पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारताची इंधन आणि गॅसची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.आखातातील तणावाचा परिणाम स्थानिक गॅस वितरणावर होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २  दिवसांपासून गॅसचा पुरवठा नाही. ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे, अशा कुटुंबांची मोठी गैरसोय झाली आहे. डेपोमध्ये गॅसचा साठा कमी असल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे, असे गॅस वितरकांनी सांगितले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा