मुंबई – लाडकी बहीण योजनेतील अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी पात्र महिलांना ३१ मार्चपर्यत मूदतवाढ देण्यात आली आहे, असे महिला व बालविकास विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना आता न्याय मिळणार आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यासह राज्यातील हजारो महिलांना चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे अपात्र ठरवण्यात आल्याचा प्रकार विधानपरिषदेत उघडकीस आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यात ज्या महिलांकडून लाडकी बहीण योजनेत चुकीची माहिती भरली गेली आहे, त्यांना दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगितले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या व्यथा विधान परिषदेत मांडल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील १७ हजार ९६७ पात्र महिलांची नावे लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणला आहे. राज्यातील महिला बालविकास विभाग प्रशासनाने प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन कोणतेही सर्वेक्षण न करता, संगणकीय प्रणालीमध्ये अत्यंत निष्काळजीपणे काम केल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील अनेक गोरगरीब आणि गरजू महिलांच्या नावापुढे शासकीय नोकरी असा चुकीचा शेरा मारण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील गोरगरिब पात्र महिलांना मिळणारा आर्थिक लाभ तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आला आहे.
राज्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या या चुकीच्या सर्वेक्षणासोबतच ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणीमुळे राज्यातील अनेक महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. राज्यातील लाडकी बहिण योजनेतील तांत्रिक अडचणी आणि माहितीमधील त्रुटींमुळे अनेक गोरगरिब पात्र महिलांचे १५०० रुपये रखडले आहे. तर हक्काचा लाभ मिळत नसल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील प्रशासनाने ही चूक तातडीने सुधारावी आणि पात्र महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासकीय चुकांची कबुली देत लाडकी बहीण योजनेत चुकीची माहिती भरली गेली आहे, त्यांना दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे महिला अपात्र ठरल्या आहेत. तर राज्यातील ज्या पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत, त्यांना ही चूक सुधारण्यासाठी सरकारने मुदत वाढ दिली आहे.
या मुदत वाढीमुळे संगमनेरसह राज्यातील लाडकी बहिण योजनेतील हजारो महिलांना त्यांचे अर्ज पुन्हा दुरुस्त करून योजनेत समाविष्ट होता येणार आहे. ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाच्या तांत्रिक अडचणींवर सरकारने वेळोवेळी मुदतवाढ देऊनही काही महिलांची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे अद्याप प्रलंबित आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे ज्या महिलांचे १५०० रुपये रखडले आहेत, त्यांना न्याय मिळणार आहे.
शासनाकडून पूर्णपणे तांत्रिक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत. वंचित राहिलेल्या लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांची फेरपडताळणी केली जाईल. आता राज्यातील अपात्र झालेल्या हजारो महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे,. असे राज्यातील महिला बालविकास विभागाने सांगितले आहे.





