राज्यात आता गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार; मंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती

SHARE:

मुंबई – राज्यात आता गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणार्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार, असे विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील बोगस डॉक्टरांवर लवकरच कडक कारवाई करणार आहे, असे विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कवर आता राज्यातील सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेत आमदार चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत राज्यातील बोगस डॉक्टरांचे धक्कादायक वास्तव मांडले आहे. विधानपरिषदेत बोलताना आमदार चित्रा वाघ यांनी राज्यातील बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कचे वास्तव सभागृहासमोर मांडले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १० वी पास असलेले लोक डॉक्टर बनून गरिबांच्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेत बोलताना आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी काही हृदयद्रावक उदाहरणे देत सांगितले की, मुंबई शहरामधील चेंबूरमधील ओम क्लिनिक या बोगस रुग्णालयात एका रिक्षाचालकाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला आहे, तर गोवंडी सारख्या भागात १० वी पास असलेला व्यक्ती गेल्या 3 वर्षांपासून क्लिनिक चालवून रुग्णांना औषधोपचार देत आहे.

तर मुंबईतील नानावटी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे काही डॉक्टर प्रॅक्टिस करत असल्याची धक्कादायक माहिती आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. बोगस डॉक्टर आणि बोगस रुग्णालयांचे मुख्य लक्ष्य महाराष्ट्र राज्यातील मोठ्या शहरातील झोपडपट्टया आणि गरीब वस्त्या आहेत. जिथे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. म्हणून राज्यातील बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे.

राज्यातील बोगस डॉक्टरांच्या समस्या नष्ट करण्यासाठी राज्यातील नगरविकास विभाग आणि राज्यातील आरोग्य विभाग यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती केवळ कागदोपत्री चौकशी न करता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत रुग्णालयांचा राज्यव्यापी सर्व्हे करून माहिती घेणार आहे. यात बोगस डॉक्टरांवर काय कारवाई करण्यात आली, याचा संपूर्ण अहवाल राज्य सरकार सभागृहासमोर सादर करेल. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करून राज्यातील महानगरपालिका आणि राज्यातील आरोग्य विभागाने परस्पर समन्वय राखावा, आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत. दंड आकारून हा गंभीर प्रश्न सुटणार नाही. त्यामूळे राज्यात गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणार्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा