बॉलिवूडमधील एक ‘शापित’ चित्रपट, प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शकाचा मृत्यू झाला, आणि १५ वर्षांनंतर तो चित्रपट अर्धवट स्थितीत प्रदर्शित करण्यात आला.

SHARE:

मनोरंजन विश्व : बॉलिवूडमधील ४० वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा शापित चित्रपट, ज्याला बनवताना घडल्या मोठ-मोठ्या घटना, तब्बल १५ वर्षानंतर अर्धवट रिलीज करण्यात आला चित्रपट.

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज झाल्यानंतर हिट किंवा फ्लॉप ठरतात. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत एक असा चित्रपट आहे, जो आपल्या यश-अपयशापेक्षा ‘बदकिस्मती’साठी प्रचंड ओळखला जातो. हा चित्रपट म्हणजे ‘लव अँड गॉड’, ज्याला हिंदी सिनेमातील सर्वात ‘शापित’ चित्रपट मानलं जातं.

या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक के. आसिफ यांनी केली होती. ‘लैला-मजनू’च्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट भव्य पातळीवर बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १९६३ साली या चित्रपटाची सुरुवात झाली आणि मुख्य भूमिकेसाठी गुरू दत्त यांची निवड करण्यात आली.

चित्रपटाचे काही भाग शूटही झाले होते. मात्र १० ऑक्टोबर १९६४ रोजी गुरू दत्त यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यांच्या या अचानक आणि गूढ मृत्यूमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आणि ‘लव्ह अँड गॉड’चं शूटिंग थांबलं.

बॉलिवूडचा ‘शापित’ चित्रपट

काही वर्षांनंतर के. आसिफ यांनी पुन्हा धैर्य एकवटत हा चित्रपट सुरू करण्याचा प्रयत्न केला. शूटिंगदरम्यानच के. आसिफ यांचं निधन झालं. या घटनेनंतर चित्रपट पुन्हा एकदा अर्धवट अवस्थेत थांबला.

या चित्रपटाशी संबंधित अनेक दुर्दैवी घटना घडल्यामुळे इंडस्ट्रीत चर्चा रंगली की ‘लव्ह अँड गॉड’सोबत जोडलेल्या व्यक्तींना अपशकुन होतो. चित्रपटातील खलनायक प्राण यांचाही एका अपघातात जीव वाचला होता.

यानंतर, चित्रपटातील दुसरे मुख्य अभिनेते संजीव कुमार यांना साइन करण्यात आलं. पण अशातच १९८५ साली त्यांचं निधन झाले, तेही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच. त्यामुळे या चित्रपटाभोवती ‘शापित’ असल्याची चर्चा अधिकच वाढली.

१५ वर्षांनी अर्धवट चित्रपट रिलीज

शेवटी, के. आसिफ यांच्या निधनानंतर तब्बल १५ वर्षांनी त्यांच्या पत्नीने हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १९८६ साली ‘लव्ह अँड गॉड’ हा चित्रपट अर्धवट अवस्थेत रिलीज करण्यात आला. मात्र, इतक्या अडचणींनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरू शकला नाही आणि फ्लॉप झाला.

‘लव अँड गॉड’ हा चित्रपट केवळ एक अपूर्ण कलाकृती नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गूढ आणि दुर्दैवी कहाणी म्हणूनही ओळखला जातो.

Leave a Comment

अधिक वाचा