पंजाब किंग्सची जोरदार कामगिरी, दुसरा विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप.

SHARE:

 खेळ : पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ स्पर्धेत शुक्रवारी ३  एप्रिलला चेन्नईला पराभूत केलं. पंजाब यासह सलग आणि एकूण २ सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबने यासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉपर ठरली.

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेतील १९ व्या मोसमात (IPL २०२६) श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सलग दुसरा सामना जिंकला. पंजाबने गुजरात टायटन्सनंतर शुक्रवारी ३ एप्रिलला यजमान चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. पंजाबने या विजयासह धमाका केला. पंजाबने चेन्नईला पराभूत करुन राजस्थान रॉयल्सलाही झटका दिला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबमुळे राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच याचा परिणाम इतर संघांवरही झालेला पाहायला मिळाला. एका बाजूला पंजाब पहिल्या स्थानी पोहचली. तर चेन्नई सलग दुसऱ्या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी १० व्या स्थानी घसरली आहे.

पंजाब कमाल, सीएसके बेहाल
पंजाबने याआधी या मोहिमेतील आपला पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता. पंजाबने या सामन्यात गुजरातवर ३ विकेट्सने विजय मिळवला होता. तर आता पंजाबने चेन्नईवर ५  विकेट्सने विजय साकारला. पंजाबने चेन्नईकडून मिळालेलं २१० धावांचं आव्हान ८ बॉलआधी पूर्ण केलं. पंजाबच्या खात्यात २  विजयासह एकूण ४  गुण झाले आहेत. तर पंजाबचा नेट रनरेट हा ०.६७३ इतका झाला आहे. तर चेन्नईचा सलग दुसऱ्या पराभवानंतर नेट रनरेट हा -२.५६२  असा झाला आहे.

चेन्नई विरुद्ध पंजाब हा आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या हंगामातील सातवा सामना होता. या सामन्याच्या निकालानंतर इतर संघांवरही परिणाम झालाय. राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. या सामन्याआधी मुंबई चौथ्या स्थानी होती. मुंबई पंजाबच्या विजयानंतर पाचव्या तर दिल्ली चौथ्या स्थानी पोहचली आहे. राजस्थान,आरसीबी, दिल्ली आणि मुंबई हे ४  संघ अजिंक्य आहेत. या ४  संघाच्या खात्यात प्रत्येकी २  गुण आहेत.

तर ४  संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. या ४ संघांमध्ये चेन्नई व्यतिरिक्त, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा समावेश आहे.

श्रेयस आर्मी नंबर 1

शनिवारी डबल हेडरचा थरार
दरम्यान शनिवारी ४ एप्रिलला १९ व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून पंजाबला पॉइंट्स टेबलमध्ये मागे टाकण्याची संधी आहे.

Leave a Comment

अधिक वाचा