नाशिक – एका मोठ्या व्यावसायिकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये १२१ अश्लील व्हिडीओ असल्याचे उघड झाले आहे. नाशिकमध्ये खरात पॅटर्न २ प्रकरणात पोलिसांनी मोठी कडक कारवाई केली आहे. नाशिकमध्ये एका व्यावसायिकाच्या विरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, व याप्रकरणात मोबाइलमध्ये १२१ व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील व्यावसायिकाच्या टॅबमध्ये शंभरहून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. नाशिक पोलिसांनी या व्यावसायिकाच्या अत्याचार प्रकरणी पीडित महिलांना समोर येण्याचे व गुन्हा दाखल करण्याचे आव्हान केले होते.
नाशिकमध्ये परत एकदा एका व्यावसायिकाचे बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरण समोर आले आहे. प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात रोज अशी प्रकरणांचे नवीन खुलासे होत आहेत. नाशिक शहरातील सातपूर एमआयडीसी परिसरातील एका व्यावसायिकाने महिलांना नोकरीचे आमिष देऊन पीडित महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणात सातपूर पोलिस ठाण्यात एका पीडित महिलेने लैंगिक शोषण प्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला आहे. काल नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका व्यावसायिकाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी अटक केले होते.
त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आता या नाशिकच्या मोठ्या व्यावसायिकाच्या टॅबफोनमध्ये शंभरहून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. नाशिकमधील सातपूर पोलिसांनी या प्रकरणी व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी परत एकदा पीडित महिलांना आव्हान समोर येण्याचे आव्हान केले आहे. सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या व्यावसायिकाविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र एरंडे वय ६३ असे या मोठ्या व्यावसायिकाचे नाव आहे. नाशिकमधील गरजू महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या व्यावसायिका विरोधातच पीडित महिलेकडून पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
सातपूर पोलिसांच्या माहितीनुसार, २ बन एप्रिल २०२६ रोजी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये एका नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस स्टेशनमध्ये ४२७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०२(अ), ३०८ (२,३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ४ आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ४ मोबाईल, २ पेनड्राईव्ह तसंच १ मेमरी कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादीच्या विविध महिला आणि मैत्रिणींचे अश्लील व्हिडीओ चित्रण केलेले सापडले आहे.
एकूण १२१ अश्लील व्हिडीओ क्लिप्स या व्यावसायिकाच्या टॅबफोनमध्ये सापडल्या आहेत. नाशिकच्या या व्यावसायिक असलेल्या आरोपीने महिलांना नोकरीचे आमिष देऊन अत्याचार केलेले उघडकीस आले आहे. या आरोपीचं नाव-रवींद्र गणपत एरंडे, वय ६३ आहे. हा आरोपी नाशिक शहरातील सातपूर इथे राहणारा आहे. या प्रकरणात पीडिते महिलेने सातपूर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधून संशयीत आरोपी व्यावसायिक रविंद्र एरंडे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. नाशिकच्या या व्यावसायिक रविंद्र एरंडेने पीडित महिलेच्या मुलास सरकारी नोकरी लावून देतो तसेच, पीडित महिलेचा गैरफायदा घेतला आहे.
पीडित महिलेला तुमचे भविष्य उज्ज्वल करून देतो असे आमिष दाखवून तिच्यावर नाशिक तसेच इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलवर जाऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. आता नाशिकच्या खंडणी प्रकरणातील फिर्यादी संशयीत आरोपी नाशिकचा व्यावसायिक रविंद्र एरंडे याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचा व्यावसायिक रवींद्र एरंडेला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रवींद्र एरंडे याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं व्हिडीओमधून समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी पीडित महिलांना गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत.





