आंतरराष्ट्रीय : इराण आणि अमेरिका युद्धात नुकताच अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या या निर्णयाने जगात आनंदाची वातावरण बघायला मिळत आहे. शिवाय जागतिक संकट कमी होण्याची शक्यता आहे. नुकताच याबाबत घोषणा करण्यात आली.
इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना उलडून गेला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. उलट परिस्थिती अधिक तणावात बघायला मिळत आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली. इराणने होर्मुज खाडी खुली करण्याबाबत घोषणा केली. आता पुन्हा एकदा जगासाठी इराणने होर्मुज खाडी खुली केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग संकटात होते. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली. होर्मुज खाडी खुली करण्यात आल्यानंतर काही तासातच तेलाच्या किमती घसरल्याचे बघायला मिळाले. इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेने इराण आणि रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला. फक्त एक महिन्याकरिता हे निर्बंध हटवले होते. जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती स्थिर ठेवण्यासाठी. त्यानंतर स्वत: अमेरिकेच्या ट्रेझरीने सांगितले होते की, इराण आणि अमेरिका यांच्या तेलावरील काढलेल्या निर्बंधांना मुदत वाढून देणार नाहीत.
ज्यानंतर जग तणावात आले. नक्की तेल कोणाकडून खरेदी करायचे, हा प्रश्न अनेक देशांपुढे होता. भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती की, आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार. आता अमेरिकेने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध काही दिवसांकरिता स्थगित केले आहेत. आता भारत रशियाकडून आरामात तेल खरेदी करू शकतो.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने १७ एप्रिलपासून सूट देण्याबाबत एक नवीन अधिसूचना जारी करण्यात आली. ज्याअंतर्गत देशांना रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी आहे. १६ मे पर्यंत ही परवानगी देण्यात आली. कोणत्याही प्रकारचे निर्बंध रशिया आणि इराणच्या तेलावर आता नसणार आहेत. अजूनही इराणसोबतच्या युद्धात तोडगा निघू शकला नाही, ज्यामुळे अमेरिकेकडून हा निर्णय घेण्यात आला.
जर मुदतवाढ दिली नाही तर वेगळे जागतिक संकट निर्माण होऊ शकते, यामुळे अमेरिकेने एक पाऊस मागे घेतल्याचे बघायला मिळत आहे. कुठे ना कुठे अमेरिका तेलाच्या मुद्दामुळे या युद्धात मागे पडताना दिसत आहे. जग ऊर्जेच्या समस्येने झगडत आहे, यावेळी जगाच्या मदतीला रशिया धावून आल्याचे बघायला मिळत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा रशियाकडून केला जात आहे.




