रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का; सरपंचपदाच्या निवडणुकीत भावाचा दारुण पराभव

SHARE:

पूणे – नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजिनामा द्यावा लागला. इतकेच नाही तर त्यांना राज्याचे महिला प्रदेशाध्यक्ष पदही गमवावे लागले. या दरम्यान आता त्यांना मोठा धक्का लागला आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांचा सख्खा भाऊ संतोष बोराटे यांचा दारूण पराभव झाला आहे.रुपाली चाकणकर यांच्यासारखी मोठे राजकीय पाठबळ पाठीशी असतानाही, संतोष बोराटे यांना आपला गड राखता आला नाही.

 

राज्यातील काही भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पुण्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीचाही यात समावेश होता. नांदूर ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी रूपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोरोटे आणि विशाल नरेंद्र थोरात रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत विशाल थोरात यांनी संतोष बोराटे यांना दारूण केला. विशाल थोरात तब्बल 304 मते मिळवून सरपंचपदाच्या खूर्चीवर विराजमान झाले. संतोष बोराटे यांचा पराभव झाल्याने रूपाली चाकणकर यांना मोठा धक्का लागला आहे. कारण त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचा भावाचा दारूण पराभव झाला आहे.

 

याशिवाय बीडच्या बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव झाला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर येथील सरपंच पद रिक्त झाले होते. यानंतर सरपंच निवडणूक जाहीर झाली. मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी आश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात सामना होता.

 

येथे सरपंच पदासाठी २८ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये ८४ टक्के म्हणजे २ हजार ८४ मतदारांपैकी १ हजार ७४४ मतदारांनी मतदान केले. यांनतर मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव झाला.

Leave a Comment