पुणे – वीजतारेचा शॉक लागून एका शेतकऱ्यासह त्याच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरात सकाळी ही घटना घडली आहे. दोघांचा शेतात तडफडून मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरात ही दुर्देवी घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. जोदार वाऱ्यामुळे तुटलेल्या वीजतारेचा शॉक लागून ग्रामीण भागातील एका शेतकरी बांधवाचा व त्याच्या बैलाचाही मृत्यू झाला आहे.
या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. राजगड परिसरातील ग्रामस्थांनी सरकारच्या वीज यंत्रणेच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव विट्ठल भागू ढेबे असे आहे. विट्ठल ढेबे हे सकाळी त्याच्या बैलाला शेतात चरायला घेऊन गेले. त्यासाठी ते गावातील डोंगरमाथ्याजवळ पोहोचले.
या वेळेत तिथे पडलेल्या एका वीजतारेचा चुकून दोघांना शॉक बसला. त्या वीजतारेत वीजप्रवाह सुरु होता आणि त्याचा शॉक बैलाला आणि विट्ठल भागू ढेबे यांना बसला. शॉक इतका तीव्र होता की शेतकरी आणि बैलाचा जागीत मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राजगड परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संबंधित वीज विभाग आणि प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या राजगड परिसरात जोरदार वारे वाहत होते. याच जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या वीजतारा तुटून तिथे पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र याबाबत माहिती ही चौकशीनंतरच समोर येईल. परंतु अचानक घडलेल्या घटनेमुळे राजगड परिसरातील शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






