प्राचार्या डॉ. मा. लेडी गव्हर्नर
डॉ. कमलताई गवई यांच्या दि. १३ जुलै २०२६ ला असलेल्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
मा. डॉ. कमलताई गवई
कमलताईंना । करांनी प्रणाम ।
कर्मांना सलाम । जन्मदिनी ॥ १ ॥
सर्वांना प्रेरक । ताईंचे जीवन ।
तन मन धन । जनांसाठी ॥ २ ॥
पाझरे सतत । मानवता झरा ।
समतेचा वारा । वाहतसे ॥ ३ ॥
कमलताईंचे । रामकृष्ण पती ।
घट्ट होती नाती । संसारात ॥ ४ ॥
पतीच्या छायेत । कमल फुलले ।
आनंदात न्हाले । संसारात ॥ ५ ॥
विपश्यनेतून । साधना अखंड ।
कर्मात ना खंड । जीवनात ॥ ६ ॥
पर्यावरणाची । कमलची ओढ ।
निसर्गाची वाढ । करितसे ॥ ७ ॥
घडविले मूलं । राजेंद्र भूषण ।
कीर्तीचे भूषण । जीवनात ॥ ८ ॥
कमलताई या । करणार दान ।
अवयव दान । जीवनात ॥ ९॥
कर्तृत्व महान । करुणा संस्कार ।
विचारांची धार । तेजस्वीच ॥ १० ॥
निःशब्द प्रेरणा । मुलांची कीर्तीची ।
कमल आईची । जीवनात ॥ ११ ॥
कमलताईंना । हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । जन्मदिनी ॥ १२ ॥
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त
अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






